पार्स्ली
(पार्सली या पानावरून पुनर्निर्देशित)
पार्सली (शास्त्रीय नाव:पेट्रोसेलिनम क्रिस्पम -Petroselinum crispum) ही एक कोथिंबिरीप्रमाणे स्वयंपाकघरात अन्नाला स्वाद देण्यासाठी वापरायची पाने असतात. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार पार्सली अ आणि क जीवनसत्त्वांनी युक्त असून तिच्यात लोहही असते. ती रक्तशुद्धीला मदत करते आणि यकृत आणि मूत्रपिंड या अवयवांसाठी चांगली असते.
पार्सलीची पाने बारीक चिरून खाद्यपदार्थावर पसरतात. इटालियन सालसा नावाच्या खाद्यपदार्था पार्सलीचा वापर आवश्यक असतो. इंग्लंड आणि फ्रान्समध्येही पार्सली वापरून विविध पदार्थ बनतात.