पारसिक शैल तिरचिमणी (इंग्लिश:Persian Rock Pipit) हा एक खंजनासारखा दिसणारा पक्षी आहे.

पारसिक शैल तिरचिमणी

या पक्ष्याच्या वरील भागाचा वर्ण पिवळट तपकिरी असतो, डोके आणि पाठीवर फिक्कट रेषा असतात. याला पिवळट रंगाची भुवई असते आणि पंख आणि शेपटी गर्द रंगाची आणि शेपटीला पांढरी किनार असते. कंठ पांढुरका असतो आणि शरीराचा इतर भाग पिवळट असून छातीवर तपकीरी पिवळट रेषा असतात. नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण संपादन

ते बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत ते कोहट, पश्चिम पंजाब या भागात आढळतात. तसेच मकराणचा समुद्रकिनारा व हरयाणा या भागात हिवाळ्यात आढळतात.

निवासस्थाने संपादन

ते गवती कुरणे, झुडूपी माळराने, पडीक जमिनी आणि गवताने युक्त कालव्यांचे काठ या ठिकाणी राहतात.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली