पाणी मोजण्याची एकके
पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरात आहेत.
स्थिर पाणी मोजण्याची एकके - लिटर (Liter), घनफूट (Cubic meter), घनमीटर (Cubic meter) .
वाहते पाणी मोजण्याची एकके - टी एम सी (TMC), क्युसेक (Cusec), क्युमेक (Cumec)
स्थिर पाणी मोजण्याची एकके
एक टी एम सी (TMC) म्हणजे १,००,००,००,००० घनफूट = २८,३१६,८४६,५९२ लिटर = २८३१ कोटी लिटर
धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC) या एककामध्ये मोजतात.
वाहते पाणी मोजण्याचे एकके
१ क्युसेक (Cusec) म्हणजे १ क्युबिक फिट /सेकंद
एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते.
१ क्युमेक (Cumec) म्हणजे १ क्युबिक मीटर /सेकंद
एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. याचा अर्थ एक सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते.