पाणजू बेट
पाणजू बेट हे मुंबईच्या अगदी उत्तरेस वसई खाडीतील एक मुहाना बेट आहे. वसई येथील मुख्य भूमीशी सालसेट बेट जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे या बेटाचा वापर केला जातो. येथे स्थित आहे19°19′59″N 72°51′00″E / 19.333°N 72.85°E 1 च्या कमाल उंचीसह मी (3 फूट).
पाणजू बेट हे एक प्राचीन ऐतिहासिक बेट आहे. सर चिमाजी अप्पांच्या काळात या बेटावर आर्थिक व्यवहार होत असत. या बेटाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि 23 स्वातंत्र्य सैनिक दिले आहेत. लोकसंख्येच्या क्षमतेनुसार पालघर जिल्ह्यात ते पहिल्या क्रमांकावर आहे. पांजू बेटाचे क्षेत्रफळ सुमारे ६०० एकर आहे आणि येथे आगरी समाज राहतो. या समुदायाचा मुख्य व्यवसाय शेती, मासेमारी, मीठ शेती आणि परंपरेनुसार हाताने वाळू काढणे आहे. येथे एक प्राथमिक शाळा तसेच सरकारी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आहे.
नायगाव फेरी टर्मिनल /नायगाव जेट्टी ते पाणजू बेट ( नायगाव पश्चिम ) आणि पांजू बेट जेटी (नायगाव पश्चिम) ते नायगाव जेट्टी (नायगाव पश्चिम) पर्यंत दर ३० मिनिटांनी बोट सेवा उपलब्ध आहे.
पाणजू बेटाचा पर्यटनविकास
संपादनस्वातंत्र्यकाळापासून उपेक्षित असलेल्या वसई तालुक्यातील पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेला पाणजू बेटासंदर्भातील पर्यटन विकास आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या बेटाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होणार असून हे बेट विकसित झाल्यास गावातील अनेक समस्या दूर होऊन येथील स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वसई खाडीतील भाईंदर आणि नायगावमध्ये पाणजू नावाचे बेट आहे. ६०० एकर जागेवर वसलेल्या बेटाचा अनेक वर्षांपासून विकास झाला नव्हता. या बेटावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. सन २०१८ मध्ये पर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय़ घेतला होता. यामध्ये देशात असलेल्या एकूण १ हजार ३८२ बेटांपैकी पहिल्या टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्या बेटांमध्ये वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्याचा विकास आराखडा बनविण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोनामुळे विलंब झाल्याने नुकताच हा आराखडा तयार करण्यात आला. पर्यटन विकास तज्ज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, इंजिनीअर यांच्यामार्फत तयार झालेला आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला.
बेट समग्र विकास या कार्यक्रमांतर्गत या बेटाचा पर्यटनविकास करण्यात येणार आहे. पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या प्रकारची जागादेखील या गावात उपलब्ध असल्याने त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यामातून निधी उपलब्ध होणार आहे. या विकास आराखड्यात सांस्कृतिक, ऐतिहासिक, मनोरंजन, पर्यावरणीय, सहासिक खेळ, सोयी सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जवळपास ८० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे या आराखड्यात नमूद केले आहे. त्यामुळे हा आराखडा राज्य सरकारला सादर केल्यानंतर राज्य सरकार तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे सादर करेल. त्यानंतर यासाठी निधी प्राप्त होणार असल्याचे पालघर जिल्हा नियोजन अधिकारी सचिन माघाडे यांनी सांगितले. या बेटाच्या विकासामुळे येथील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच आता पाणजू हे बेट पर्यटनाचे स्थळ होणार असल्याने अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पाणजू बेट विकासामध्ये या गोष्टींचा समावेश
संपादन- बेटावर यूएसपी मध्यवर्ती सुविधा केंद्र बनविण्यात येणार असून ते माशाच्या आकारात आणि पूर्णपणे पर्यावरणास अनुकूल बांबूपासून बनविण्यात येणार आहे.
- मँग्रोव्ह पार्क असेल, यामधून जंगलाचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होईल.
- जेट्टीचा विकासही प्रस्तावित करण्यात आला आहे. या जेटी टर्मिनलमध्ये तिकीट काऊंटर, सुरक्षा तपासणी, जड सामान ठेवण्यासाठी खोली, शौचालये, प्रतीक्षालय आणि स्मरणिका दुकाने असतील.
- अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माहिती केंद्र असणार आहे.
- बांबूची एक मजली इमारत उभी करणार आहे. यामध्ये संग्रहालय, मत्स्यालय, अॅम्फीथिएटर, मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट आणि इतर पर्यटन सुविधा जसे शौचालय, प्रतीक्षा कक्ष आदी असतील.
- अॅम्फी थिएटरमध्ये सुमारे २०० लोक बसतील आणि लोकनृत्य प्रदर्शन आणि संगीत मैफिलीसारख्या विविध कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.
- बेटावरील दोन तलाव, गोडे तलाव आणि खारे तलाव यांचे सुशोभीकरण केले जाईल.
- साहसी क्रीडा उपक्रम एका साहसी क्षेत्रात आयोजित केले जातील. यामध्ये वॉल क्लायबिंग, नेट क्लायबिंग, कॉन्फिडन्स गेम्स, लांब उडी आणि पोल क्लायबिंगचा समावेश असेल.
- उद्यानात चालण्यासाठी ट्रॅक, निरीक्षण स्थळ आणि पक्षी निरीक्षण गॅलरी असणार आहे.
- खारफुटी, त्याच्या वनस्पती, प्राण्यांविषयी माहिती देणारी चित्रे आणि वस्तू प्रदर्शित करण्यासाठी एक खारफुटी केंद्र असणार आहे.
- बेटावर लाकडी कोरीवकाम आणि चिखलापासून बनवलेले पुतळे आणि शिल्प लावण्यात येणार आहेत.[१]
संदर्भ
संपादन- ^ "पाणजू बेटाचा पर्यटनविकास". Maharashtra Times. 2022-07-05 रोजी पाहिले.