पाचघर (मोखाडा)

(पाचघर(मोखाडा) या पानावरून पुनर्निर्देशित)

पाचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?पाचघर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.७५६ चौ. किमी
जवळचे शहर मोखाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
६४८ (२०११)
• ८५७/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली,कुणबी.
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थानसंपादन करा

हवामानसंपादन करा

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवनसंपादन करा

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ६४८ लोकसंख्येपैकी ३३२ पुरुष तर ३१६ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधासंपादन करा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावेसंपादन करा

किणीस्ते, कोचळे, कडूचीवाडी, कारेगाव, कारोळ, खुटाळ, आमगाव, आंभई, कुंडाळ, रायसळगाव,काष्टी ही जवळपासची गावे आहेत.कारोळ ग्रामपंचायतीमध्ये कारोळ, आणि पाचघर ही गावे येतात.

संदर्भसंपादन करा

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/