पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. [] मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी), पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठीचे आमंत्रण नाकारले होते.[]

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २०१७
बांगलादेश
पाकिस्तान
तारीख जुलै २०१७
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

एप्रिल २०१७ मध्ये, दौरा रद्द केला गेला.[] दौरा पुढे ढकलण्याचे मुख्य कारण सांगताना पीसीबीचे अध्यक्ष शाहियार खान म्हणाले की,

"याआधी दोन वेळा पाकिस्तानने परस्पर संवादाशिवाय दोन वेळा बांगलादेश दौरा केला आहे.[][] शाहरियार पुढे म्हणाले, की ते पुढील वर्षी किंवा नंतर इतर वेळच्या शक्यतेचा विचार करतील.[]"

बीसीबीच्या माध्यम समितीचे अध्यक्ष म्हणाले की, या निर्णयाबद्दल ते "खरोखर आश्चर्यचकित" झाले.[] पीसीबी आणि बीसीबी दरम्यान अधिकृत संवाद झाला नाही, बीसीबीला दौरा रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळाले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भाविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बांगलादेशने पाकिस्तान दौर्‍याचे आमंत्रण नाकारले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "पाकिस्तानकडून बांगलादेशचा दौरा रद्द". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तानचा २०१७ बांगलादेश दौरा रद्द". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ a b "पाकिस्तानचा दौरा रद्द झाल्याने बीसीबी आश्चर्यचकित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.