पवनीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे स्थित आहे. तो भंडारा शहरापासून ४७ आणि नागपूरपासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त्यांपैकी एका टेकडीवर पवन राजाचा हा किल्ला आहे.

पवनीचा किल्ला
नाव पवनीचा किल्ला
उंची ६ मीटर (?)
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण पवनी, जिल्हा- भंडारा, राज्य - महाराष्ट्र भारत ध्वज भारत
जवळचे गाव मोखारा, सेंद्री, बाम्हणी,
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}

पवनी शहरात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. पवनीच्या किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव शहरात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.

इतिहास

संपादन

पवनी हे बौद्ध धर्मातील [[हीनयान पंथ}हीनयान पंथाचे]] आराधना केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात ते वैभवशाली बनले.[[सम्राट अशोक[[ाचे येथे काही काळ वास्तव्य होते व. त्याने मुलगी संघमित्रा हिला येथूनच श्रीलंकेला पाठवले, असे इतिहास सांगतो.

पवनी येथे झालेल्या दुसऱ्या उत्खननात इ.स. पूर्व पहिल्या शतकातला क्षत्रपकुमार रूपीअम्माचा स्तंभलेख (हा सध्या नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात आहे.) आढळला. रूपीअम्मा हा कुषाणाचा क्षत्रप होता. त्याला सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीने पराभूत केले. या विजयानंतर त्याने नाशिक येथील गुहालेखात ‘वेनाटक स्वामी’ असे स्वतःला संबोधले आहे.

१९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तू संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उत्खनन झाले. यात इ.स.पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याचे अलंकार, तांब्याची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशभूषा करणाऱ्या महिलेची मूर्ती आणि अरब देशांशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या वस्तू आढळल्या. डॉ. मिराशी यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेकडे केलेल्या उत्खननात राजा भगदत्त यांचा शिलालेख मिळाला. अमरेंद्रनाथांच्या मते ‘इतका प्राचीन, सुरक्षित, अभंग किल्ला महाराष्ट्रात नाही.’ उत्खननात मिळालेले ‘अरेबियन पत्थर’ पवनीचा समुद्रमार्गाने अरब देशांशी व्यापार सुचवतात, तर हाडांपासून बनवलेल्या सुया ह्या २३०० वर्षांपूर्वी विणकामात हे क्षेत्र अग्रणी होते, हे दर्शवतात.