पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान

हा एक संस्कृत मधील काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना जयराम पिंड्येयांनी केली .याच्यात पर्णाल म्हणजे पन्हाळा किल्ला होय.शिवाजी महाराजांनी इ.स.१६७३ मध्ये हा किल्ला दुसऱ्या वेळेस जिंकला होता.शिवाजीने हा किल्ला कसा जिंकला? या विषयावरच हा ग्रंथ आधारित आहे.पन्हाळा जिंकल्यापासून ते बहलोलखान व प्रतापराव गुज्जर यांच्या संघर्षा पर्यंतचा वृत्तांत या ग्रंथात आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारा महत्वपूर्ण काव्यग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहावे लागते.मराठ्यांच्या इतिहासाचे हे एक संस्कृत साधन आहे.

संदर्भयादी

संपादन