पप्पू यादव
भारतीय राजकारणी
राजेश रंजन ( २४ डिसेंबर १९६७), पप्पू यादव म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी आहेत.[१][२] त्यांनी १९९१, १९९६, १९९९ आणि २००४ मध्ये बिहार लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांचे (अपक्ष, समाजवादी पक्ष, लोक जनता पक्ष, राष्ट्रीय जनता दल उमेदवार म्हणून निवडणुका जिंकल्या आहेत. २०१५ मध्ये पप्पू यादव 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे' खासदार बनले.[३] पप्पू यादव सध्या जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) या पक्षाचे नेते आहेत.[४]
संदर्भ
संपादन- ^ Pappu Yadav returns to RJD, gets ticket from Bihar's Madhepura. Ndtv.com (11 March 2014). Retrieved on 2015-07-28.
- ^ "Ditched by the BJP, Pappu Yadav Goes the Samajwadi Party Way".
- ^ Pappu Yadav, once accused of murder, now among 'best performing' MPs Archived 2015-03-23 at the Wayback Machine.. Hindustantimes.com (22 March 2015). Retrieved on 2015-07-28.
- ^ "Purnea MP Pappu Yadav forms new Jan Adhikar Party with Brajesh Sah as Pradesh Mahasachiv".