नेवारी लिपी
नेवारी किंवा नेपाली ही नेपाळ देशामध्ये हस्तलिखितांसाठी वापरल्या गेलेल्या अनेक लिपिंपैकी एक लिपी आहे आणि ह्याच नावाची एक स्थानिक भाषादेखील तेथे बोलली जाते. हल्लीच्या काळात नेवारी लिपीला ’प्रचलित लिपी’ किंवा ’प्रचलित नेवारी लिपी’ ह्या नावांनी ओळखले जाते. नेवारी लिपीचा वापर संस्कृत लेखांकरिता होत असे. ही लिपी अन्य भारतीय लिपींप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीतात.