नेव्हाडा

(नेवाडा या पानावरून पुनर्निर्देशित)

नेव्हाडा (इंग्लिश: Nevada, En-us-nevada.ogg नेव्हॅडा ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

नेव्हाडा
Nevada
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: सिल्व्हर स्टेट (Silver State)
ब्रीदवाक्य: All For Our Country
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी कार्सन सिटी
मोठे शहर लास व्हेगास
क्षेत्रफळ  अमेरिकेत ७वा क्रमांक
 - एकूण २,८६,३६७ किमी² 
  - रुंदी ५१९ किमी 
  - लांबी ७८८ किमी 
 - % पाणी २.४
लोकसंख्या  अमेरिकेत ३५वा क्रमांक
 - एकूण २७,००,५५१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ९/किमी² (अमेरिकेत ४२वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ३१ ऑक्टोबर १८६४ (३६वा क्रमांक)
संक्षेप   US-NV
संकेतस्थळ www.nv.gov

नेव्हाडाच्या पश्चिमेला कॅलिफोर्निया, पूर्वेला युटा, आग्नेयेला अ‍ॅरिझोना तर उत्तरेला ओरेगनआयडाहो ही राज्ये आहेत. कार्सन सिटी ही नेव्हाडाची राजधानी तर लास व्हेगास हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.

नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या अमेरिकन गृहयुद्धात उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर बॅटल बॉर्न (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. लास व्हेगास येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. वेश्याव्यवसायाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.

गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.

मोठी शहरे

संपादन

गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: