राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद

भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणारी तसेच मान्यता देणारी संस्था
(नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( इंग्रजी: National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण , इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. याची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक)
National Assessment and Accreditation Council (NAAC)
चित्र:NAAC LOGO.png
नॅक बोधचिन्ह
संस्थेचे अवलोकन
निर्माण १९९४
अधिकारक्षेत्र भारत
मुख्यालय बंगलोर, कर्नाटक, भारत
ब्रिद Excellence . Credibility . Relevance
संस्थेचे कार्यकारी अधिकारी
  • प्रा. एस.सी. शर्मा[१], संचालक
मूळ खाते शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
मूळ अभिकरण विद्यापीठ अनुदान आयोग
संकेतस्थळ www.naac.gov.in
खाते

पार्श्वभूमी संपादन

मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा 'दर्जा' आणि 'शैक्षणिक गुणवत्ता' ओळखला जातो. हे मूल्यांकन कोणत्याही शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ प्रमाणन एजन्सीद्वारे निश्चित केलेल्या गुणवत्तेची पातळी निश्चित करते. शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद घेतली जाते.

मूल्यांकन संपादन

पुढील आठ श्रेणींद्वारे नॅक विविध शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करते[२]

संस्थात्मक CGPA श्रेणी अक्षरात्मक श्रेणी कामगिरी निष्कर्ष
३.५१ – ४.०० अ++ मान्यताप्राप्त
३.२६ – ३.५० अ+ मान्यताप्राप्त
३.०१ – ३.२५ मान्यताप्राप्त
२.७६ – ३.०० ब++ मान्यताप्राप्त
२.५१ – २.७५ ब+ मान्यताप्राप्त
२.०१ – २.५० मान्यताप्राप्त
१.५१ – २.०० मान्यताप्राप्त
≤ १.५० अमान्य

संदर्भ संपादन

  1. ^ "Director NAAC". NAAC. 10 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Assessment Outcome". www.naac.gov.in.