नील बट्टे सन्नाटा हा २०१६ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. अश्विनी अय्यर तिवारीने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट असून याला अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली. हा चित्रपट इंग्लिशमध्ये द न्यू क्लासमेट या नावाने प्रदर्शित झाला आणि तमिळमध्ये अम्मा कनक्कू या नावाने पुनर्निर्माण करण्यात आले.

कथानकसंपादन करा


खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात अर्धशिक्षित असलेली आई (चंदा) आणि तिची मुलगी अपू यांची गोष्ट आहे. इतरांच्या घरात घरकामे करून गुजराण चालविणारी आई आपल्या मुलीला शिकवत असताना मुलीला आलेल्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी स्वतःच्या तिच्या शाळेत जायला लागते. मुलीला याची लाज वाटते. आईची शाळेतील प्रगती पाहून अपूला राग येतो. अपूने आपल्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली तर चंदा शाळा सोडून देण्याचे कबूल करते. अपू चंदापेक्षा अधिक मार्क मिळविते पण ते फक्त आईला शाळेतून घालवून देण्यासाठी. हे कळल्यावर चंदाला वाईट वाटते व ती पुन्हा शाळेत जायला लागते. शाळेत वेळ जात असल्याने चंदाची घरकामेही सुटतात पण ती इतर ठिकाणी कामे मिळवीत अपूचे आणि स्वत)चे शिक्षण चालूच ठेवते. अपूला चंदाच्या कष्टांची जाणीव झाल्यावर ती आईचा राग सोडून देते आणि दोघी एकत्र दहावीची परीक्षा देतात. अपू पुढे आयएएस अधिकारी होण्याची तयारी करायला लागते.

नील बट्टे सन्नाटाचा अर्ध शून्याला शून्याने भागले तर शून्यच राहते असा आहे व या चित्रपटात त्याचा अर्थ बेकार, निकामी असा आहे.