नीलफलक ही एक मूळची इंग्रजी असलेली संकल्पना आहे. शहरातील अथवा देशातील प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रांतील असली तरी ती तिच्या हयातीत राहत असलेल्या निवासस्थानांवर निळ्या रंगाचे गोल फलक लावतात. या फलकावर 'अमुक क्षेत्रातली ही व्यक्ती (नाव)' येथे राहत होती असे वाक्य असते. इंग्लंडच्या धर्तीवर पुण्यातही अशा प्रकारचे नीलफलक लावण्यात येतात. शंभराहून अधिक नामवंत व्यक्तींच्या पुण्यातील निवासस्थानावर असे फलक लावण्यात आले आहेत. म.श्री. दीक्षित, वसंतराव गोखले आणि खंडेराव केसकर या त्रयीने पहिल्यांदा ही नीलफलक लावण्याची कल्पना राबवायला सुरुवात केली.