निसार ट्रॉफी भारतातील क्रिकेट स्पर्धा होती. २००६मध्ये सुरुवात झालेली ही स्पर्धा दरवर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जात असे. ही स्पर्धा चार दिवसांचा एक सामना असून ती भारतातील रणजी चषकविजेता आणि पाकिस्तानातील कायदे आझम ट्रॉफी विजेत्यांमध्ये खेळवली जात असे. या स्पर्धेस भारतीय क्रिकेट खेळाडू मोहम्मद निसार यांचे नाव दिलेले होते.

भारतावर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडल्यावर ही स्पर्धा बंद झाली.