निवृत्ती महाराज वक्ते

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते (जन्म : बुलढाणा, ३० ऑक्टोबर १९३४) हे एक वारकरी संप्रदायातील महाराज आहेत . महाराष्ट्रातील थोर संत परंपरेला पुढे नेण्याचे थोर कार्य वक्ते महाराज करत आहेत. यांचे प्रवचन म्हणजे मुख्यता ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ग्रंथातील अभंग,ओव्या यांचे स्पष्टीकरण करणे व साधारण भाषेत समजावणे . संत साहित्याचा प्रचार व प्रसार ते करत आहेत हिंदूधर्मद्वेष्ट्या लोकांवर टिका करणे व नास्तिकवादी पुरोगामित्वाचा विरोध , हे यांचे किर्तनाचे विशेष होत . २०१७चा संत साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दि . 8 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार का नव्हता? याविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

वक्ते यांनी संपादित केलेले ग्रंथ

संपादन

समाजसेवा

संपादन

ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन,प्रवचने अत्यंत अभ्यासू असून प्रवचनांद्वारे समाजात जागृती व प्रबोधन

करण्याचे कार्य तसेच समाजात अध्यात्म वाढवण्याचे कार्य ६०हून अधिक वर्षे अखंड सुरू असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधक राष्ट्र घडवण्याचे कार्य करत आहेत.

पुरस्कार

संपादन

महाराष्ट्र सरकारकडून संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला होता.

संदर्भ[]

https://www.youtube.com/watch?v=cqDqmkAjo3U

https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o

  1. ^ https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o. "https://www.youtube.com/watch?v=D9DmJQJz66o". External link in |title= (सहाय्य)