निर्मलजीत सिंह सेखों

(निर्मल जित सिंग सेखों या पानावरून पुनर्निर्देशित)

निर्मल जित सिंग सेखों (१७ जुलै, १९४३:लुधियाना, पंजाब, भारत - १४ डिसेंबर, १९७१:श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत) हे भारतीय वायुसेनेचे अधिकारी होते.

फ्लाइंग ऑफिसर
निर्मलजीत सिंह सेखों
परमवीर चक्र
150
जन्म १७ जुलै, १९४३ (1943-07-17)
लुधियाना,[] (सध्या पंजाब, भारत)
मृत्यू १४ डिसेंबर, १९७१ (वय २६)
श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत
Allegiance भारत भारत
सैन्यशाखा साचा:Air forceभारतीय वायुसेना
हुद्दा फ्लाइंग ऑफिसर
सैन्यपथक १८वी स्क्वॉड्रन
लढाया व युद्धे १९७१चे भारत-पाक युद्ध
पुरस्कार परमवीर चक्र (मृत्युपरांत)

दिनांक १४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेखो सावध होतेच पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळयामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती, गोळ्याच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखोचे नॅंॅंट विमान क्षणार्थात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांंचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र बचावले.

परंतु दुर्दैवाने या भिषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखोचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. फ्लाइंग ऑफिसर सेखोंना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता. मात्र त्याही परीस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर सेखो यांना सलाम.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Vasdev, Kanchan (३० जानेवारी 2003). "Sekhon's hamlet to be 'adarsh village'". The Tribune (Chandigarh). 1 March 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 April 2016 रोजी पाहिले.