निर्मला पुरंदरे
निर्मला बळवंत पुरंदरे, यांचा जन्म बडोद्यामध्ये झाला.[१] माहेरच्या माजगांवकर (जन्म : ५ जानेवारी १९३३ – - २० जुलै २०१९) या 'वनस्थळी' संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.[२] पुण्याला शिकायला येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यासाठी त्या 'विद्यार्थी सहायक समिती'चे वसतिगृह चालवायच्या. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील स्त्रियांमधून बालवाडी शिक्षिका तयार केल्या.[३] पुरंदरेंनी वीसहून अधिक वर्षे श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' या साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात काम केले होते. 'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' या संस्थेच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या.[४]
व्यक्तिगत जीवन
संपादननिर्मलाताई या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी,[५] 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि 'राजहंस प्रकाशना'चे दिलीप माजगावकर यांच्या भगिनी होत. गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे या निर्मलाबाईंच्या कन्या आहेत.
पुस्तके
संपादन- निर्मला पुरंदरे यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत, ती खालीलप्रमाणे
- बालवाडीताई प्रशिक्षण
- स्नेहयात्रा (प्रवासवर्णनपर)[६]
- निर्मला पुरंदरे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- आत्मसिद्धा निर्मला पुरंदरे आणि मिशन 'वनस्थळी'ची चरितकथा (माणिक कोतवाल)
पुरस्कार
संपादननिर्मला बळवंत पुरंदरे यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे:
- दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कार (१९९८)[३]
- पुणे महापालिकेचा पुण्यभूषण पुरस्कार (२०१२)
- महर्षी कर्वे संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार (२००३)
- महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००१)
संदर्भ
संपादन- ^ "निर्मला पुरंदरे यांचे जीवनकार्य". महाराष्ट्र टाइम्स. २१ जुलै २०१९. 2019-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "पुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन". २१. ७. २०१९. 2019-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "Pune: वनस्थळीच्या संस्थापिका निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन". 2019-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "स्निग्ध आणि सात्त्विक". २३ जुलै २०१९.
- ^ २०. ७. २०१९. "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन". 2019-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "निर्मला पुरंदरे".