निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक टंकशाळा (टाइप-फाउण्ड्री) तसेच प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली.[१] सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते.

निर्णयसागर टंकशाळासंपादन करा

जावजी दादाजी चौधरी हे त्यांची घरची आर्थिक स्थिती बरी नसल्यानेे साधारणतः वयाच्या दहाव्या वर्षापासून अमेरिकन मिशन प्रेसमध्ये मुद्राक्षर (टाइप) घासण्याचे काम करत असत[२]. त्यांनी त्या कामातले कौशल्य आत्मसात करून घेतले होते. अन्य काही ठिकाणीही काही काळ नोकऱ्या केल्यानंतर आपण स्वतःचीच टंकशाळा काढावी असे त्यांनी ठरवले[३]. १८६४च्या सुमारास जावजींनी स्वतःची टंकशाळा सुरू केली[४]. राणूजी रावजी आरू हे त्यांचे सहकारी होते.


या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराठी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध होत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदेशातील नीमच येथून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ]

संदर्भसंपादन करा

संदर्भसूचीसंपादन करा

  • कुलकर्णी, पुरुषोत्तम बाळकृष्ण. निर्णयसागरची अक्षर-साधना : शेठ जावजी दादाजी ह्यांचें चरित्र.
  • नाईक, बापूराव. भारतीय ग्रंथमुद्रण.