एखाद्या खगोलीय वस्तूच्या अंगभूत प्रखरतेच्या मापनाला निरपेक्ष दृश्यप्रत (इंग्रजी: Absolute magnitude) म्हणतात. एखाद्या वस्तूला एका निरीक्षकाने तिच्यापासून १० पार्सेक किंवा ~३२.६ प्रकाशवर्ष अंतरावरून पाहिली असता (वस्तू आणि निरीक्षकाच्या मध्ये धूळ आणि वायू किंवा इतर गोष्टी नसताना) तिची भासणारी प्रखरता/तेजस्विता (आभासी दृश्यप्रत) म्हणजे निरपेक्ष दृश्यप्रत होय. आभासी दृश्यप्रतीप्रमाणे निरपेक्ष दृश्यप्रत अंतरानुसार बदलत नाही. यामुळे सगळ्या वस्तूंच्या अंगभूत तेजस्वितेची आणि उत्सर्जित उर्जेची एका समान पातळीवर तुलना करता येऊ शकते. ताऱ्यांसाठी निरपेक्ष दृश्यप्रत दृश्य वर्णपटाच्या (V) आधारे देतात.

खगोलीय वस्तू जेवढी तेजस्वी, तेवढी तिची निरपेक्ष दृश्यप्रत कमी असते. निरपेक्ष दृश्यप्रतीमधील १.०चा फरक म्हणजे निरपेक्ष तेजस्वितेमध्ये २.५१२ ≈ १००.४ एवढा फरक असतो. म्हणून -२ निरपेक्ष दृश्यप्रत असलेला तारा ३ निरपेक्ष दृश्यप्रत असलेल्या ताऱ्यापेक्षा १०० (किंवा २.५१२) पट जास्त तेजस्वी असतो.

एखाद्या वस्तूची आभासी दृश्यप्रत आणि तेजस्विता अंतर दिले असता त्यापासून त्या वस्तूची निरपेक्ष दृश्यप्रत पुढील समीकरणाने काढता येते:


जवळच्या वस्तूंसाठी हे त्यांचे खरे अंतर असते. पण अतिशय लांबच्या वस्तूंसाठी तेजस्विता अंतर त्यांचे खरे अंतर नसते. अशा वस्तूंसाठी आईनस्टाईनचा सामान्य सापेक्षतावादाचा सिद्धान्त वापरून अंतर मोजावे लागते.