निबंधलेखन
निबंधलेखन हा भाषेच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक आहे. वाचन, लेखन आणि सराव यांतून निबंधलेखनाची क्षमता विकसित करता येते. निबंध म्हणजे सुसंगत व योग्य विचारांची अर्थपूर्ण लिखित रचना होय. निबंधलेखनामुळे कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्याची सवय वृद्धिंगत होते. लेखनात, बोलण्यात मुद्देसुसूदणा येतो. विचारांची सूत्रबद्ध मांडणी, शब्दसंपत्तीचा नेमका वापर या बाबी निबंधाकौशाल्य अवगत केल्याने होतात.
निबंधलेखानाचे मूलतः चार प्रकार आहेत:-
१.वैचारिक निबंध
२.कल्पनारम्य निबंध
३.वर्णनात्मक निबंध
४.आत्मवृतात्मक निबंध
५. लघुनिबंध
मराठीतील गाजलेले निबंधकार
संपादन- आचार्य काका कालेलकर
- लोकहितवादी
- विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर (यांचे प्रसिद्ध पुस्तक 'निबंधमाला - २ भाग)
- काळकर्ते शिवराम महादेव परांजपे (यांचे प्रसिद्ध पुस्तक : काळातील निवडक निबंध - १० खंड)
लघुनिबंधकार आणि त्यांचे लघुनिबंधसंग्रह
संपादन- अनंत काणेकर
- जोगी
- दीक्षित
- ना.सी. फडके (यांचे प्रसिद्ध पुस्तक - गुजगोष्टी)
- बा.भ. बोरकर
- गोविंद नारायण माडगावकर
- वि.पां. दांडेकर
- वि.स. खांडेकर (यांची प्रसिद्ध पुस्तके - अजुनी येतो वास फुलांना, मुखवटे, रानफुले, वायुलहरी, सांजवात्सल्य)
पुस्तके
संपादन- मराठी लघुनिबंधाचा इतिहास (आनंद यादव)