नितीश राणा
भारतीय क्रिकेटपटू
नितीश राणा (जन्म - २७ डिसेंबर, १९९३:दिल्ली) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा अंतर्देशीय स्पर्धांमध्ये दिल्लीकडून खेळतो[१]. तो एक अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला दिल्लीचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले[२].
भारतीय क्रिकेटपटू | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २७, इ.स. १९९३ दिल्ली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
व्यवसाय |
| ||
खेळ-संघाचा सदस्य |
| ||
| |||
कारकीर्द
संपादनराणाने २०१५-२०१६ मधील रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी भारत अ संघात स्थान देण्यात आले होते. ऑक्टोबर२०१९ मध्ये, त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी इंडिया बीच्या संघात स्थान देण्यात आले[३].
संदर्भ
संपादन- ^ "नीतीश राणा के आगे पस्त हुआ ये बॉलर, लगाई छक्कों की हैट्रिक- Video". आज तक (हिंदी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.
- ^ "Once a legend, always a legend: MS Dhoni gifts number 7 jersey to Nitish Rana, Kuldeep Yadav; clip goes viral". Zee Business. 2020-10-30. 2020-10-30 रोजी पाहिले.
- ^ Bhargav, Dixit (2020-10-29). "Rana cricket player: Watch Nitish Rana smashes three consecutive sixes off Karn Sharma in KKR vs CSK match". The SportsRush (इंग्रजी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.