निटूर
निटूर हे एक महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील गाव आहे.हे गाव जहिराबाद ते लातूर या महामार्गावर वसलेले आहे.या गावातून लातूर जिल्हा अनेक गावांना मार्ग जातात.हे गाव एक प्रकारे मुख्य ठिकाण असल्या सारखे आहे.या गावात विविध समाज आहेत. महामार्गाच्या बाजूलाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पुतळा आहे.याच्या वरूनच कळते की येथे दलित वस्ती अस्तित्वात आहे.गावाच्या आतील बाजूस लातूर भर प्रसिद्ध असलेले साईनाथ मंदिर आहे. गावच्या मध्य बाजुत मुस्लिम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे.या गावाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या गावचे दोन भाग पडतात.ते म्हणजे निटुर मोड आणि निटूर.