निक्की हेली
निक्की हेली (इंग्लिश: Nikki Haley; जन्मनाव: निम्रता रांधवा, २० जानेवारी १९७२ ही एक भारतीय वंशाची अमेरिकन राजकारणी व साउथ कॅरोलायना राज्याची विद्यमान राज्यपाल आहे. २०१० साली राज्यपालपदावर निवडून आलेली हेली २००५ ते २०११ दरम्यान साउथ कॅरोलायना प्रतिनिधींच्या सभागृहाची सदस्य होती. बॉबी जिंदाल नंतर राज्यपाल बनलेली ती दुसरीच भारतीय-अमेरिकन व्यक्ती आहे. २०१४ मधील पुनर्निवडणुकीत विजय मिळवून हेलीने सत्ता राखली. हेली साउथ कॅरोलायनाची पहिलीच महिला राज्यपाल असून ती आजच्या घडीला अमेरिकेमधील सर्वात तरुण (वयः ४४) राज्यपाल आहे.
निक्की हेली Nikki Haley | |
साउथ कॅरोलिनाची ११६वी राज्यपाल
| |
विद्यमान | |
पदग्रहण १२ जानेवारी २०११ | |
मागील | मार्क सॅनफर्ड |
---|---|
पुढील | हेन्री मॅकमास्टर |
जन्म | २० जानेवारी, १९७२ ओक्लाहोमा सिटी, साउथ कॅरोलायना |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन |
पती | मायकल हेली |
अपत्ये | २ |
गुरुकुल | क्लेम्सन विद्यापीठ |
धर्म | मेथडिस्ट (प्रोटेस्टंट) शीख (लग्नापूर्वीचा) |
२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूकीमध्ये हेलीने प्रथम मार्को रुबियो ह्याला तर नंतर टेड क्रुझ ह्याला आपला पाठिंबा जाहीर केला होता. निवडणुक प्रचारादरम्यान डॉनल्ड ट्रम्पविरुद्ध जहाल वक्तव्ये केलेल्या हेलीने नंतर ट्रम्पच्या शासनात संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूताचे पद स्वीकारले.