नारायण वासुदेव गोखले
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
चित्रकार ना.वा.गोखले यांचे संपूर्ण नाव नारायण वासुदेव गोखले. लोक यांना नाना गोखले म्हणून संबोधतात. त्यांचा जन्म ३ जून १९११रोजी झाला. ते उत्तम चित्रकार असून एकेकाळी शास्त्रीय संगीत गात होते, पेटीही वाजवत. पण पुढे पुढे श्रवणशक्ती संपल्यामुळे हे सर्व बंद झाले. नानांच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईसकट अनेक शहरांतून झाली आणि अजूनही होतात.
नानांचा शंभरावा वाढदिवस नागपूरमध्ये सिस्फाच्या (सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फाइन आर्ट्स) चित्रगॅलरीत साजरा झाला होता. त्यावर्षीची कोजागिरी सर्व वयाच्या चित्रकारांनी रात्रभर चित्रे काढून साजरी केली. त्या रात्री, ना.वा.गोखलेही चित्रे काढत होते, आणि तरुण चित्रकार त्यांना न्याहाळत होते..
ना.वा.गोखले हे दर्यापूरच्या प्रबोधन हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. पत्नी शांताबाई जिवंत होत्या तोपर्यंत ते दर्यापूरला रहात. आता आपल्या विवेक नावाच्या मुलाकडे नागपूरला राहतात. नाना चित्रकार तर आहेतच, पण त्यांना उत्तम संस्कृत येते. नानांचे दर्यापूरच्या पंचक्रोशीचा रंगरेषाबद्ध इतिहास हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
अन्य ग्रंथसंपदा
संपादन- गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र)
- गांधी विजय(चरित्रकाव्य)
- गीतेचा इंग्रजी अनुवाद
- गीतेचे दोन भाष्यकार : शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर
- गीतेत काय आहे ?
- ’जुना करार’चे ओवीरूप भाषांतर
- थेम्सच्या तीरावरून (लेखमाला)
- दासबोधात काय आहे ?
- भगवद्गीतेचे समश्लोकी हिंदी रूपांतर
- शुभवर्तमान
- सांध्यसूक्ते (काव्यसंग्रह)
कुटुंब
संपादननानांच्या पत्नी कै. शांताबाई, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले पुत्र विवेक, नातू योगेश, नात डॉ.साधना शिलेदार, पणती संयुजा वगैरे.