नारळी भात ही भोजनासाठी केली जाणारी एक पाककृती आहे.[१]महाराष्ट्र राज्यात नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी हा पदार्थ भोजनात केला जातो.[२]

मदुराई नारळ भात

प्रक्रिया

संपादन

नारळी भात तयार करताना शिजवलेला भात आणि खोवलेला नारळ अथ वा नारळाचे काढलेले दूध वापरले जाते. यामध्ये पदार्थाला गोडी आणण्यासाठी गुळाचा प्रामुख्याने वापर केला जातो. पदार्थाची चव वाढविण्यासाठी त्यात वेलची पूड, सुकामेवा यांचा वापर केला जातो.[१] नारळाचा वापर करून विविध देशांमध्ये भाताच्या पाककृती केल्या जातात. त्या तिखट चवीच्याही असतात. भारताच्या विविध प्रांतात विशेषतः दक्षिण भारतात नारळी भाताच्या विविध प्रकारच्या पाककृती प्रचलित आहेत.[३]

उपयोग

संपादन
 
नारळी भात

लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी हा पदार्थ उपयोगी पडतो असे मानले जाते'.[४]

हे ही पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "World Coconut Day Recipes: घरच्या घरी बनवा नारळाची बर्फी आणि नारळी भात". Loksatta. 2020-09-02. 2021-05-29 रोजी पाहिले.
  2. ^ Dāṇḍekara, Gopāla Nīlakaṇṭha (1969). Mahārāshṭra-darśana. Majesṭika Buka Sṭāla.
  3. ^ "Inside the Indian Jewish kitchen". The New Indian Express. 2021-05-29 रोजी पाहिले.
  4. ^ "मुलांसाठी बनवा नारळ-तांदळाची 'ही' खास रेसिपी, चेहरा उजळण्यासोबत हाडे होतील मजबूत!". Maharashtra Times. 2021-05-29 रोजी पाहिले.