नाथराव नेरळकर

एक संगीतज्ञ

पं. नाथराव नेरळकर (जन्म : नांदेड, सन १९३४, - औरंगाबाद, २८ मार्च २०२१) हे मराठवाड्यातील एक संगीतज्ञ होते..तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती.

गानमहर्षी अण्णासाहेब ऊर्फ अ.ह. गुंजकर यांच्याकडे त्यांनी त्यांच्या घरी २२ वर्षे राहून संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले.

कुमार गंधर्वांच्या अंगणामध्ये एक नागवेलीचे-विड्याच्या पानाचे झाड होते. पंडित नाथराव नेरळकर आणि कुमार गंधर्व यांची अनेक वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी कुमार गंधर्वांच्या अंगणात असलेल्या नागवेलीचे ते रोपटे नाथरावांनी औरंगाबादला आणले. तिथून निरखी कुटुंबीयांकडे आले. तीच वेल निरखींच्या बंगल्यात अगदी दर्शनी भागात आहे.

नेरळकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

संपादन
  • भगवानरावजी लोमटे स्मृति राज्य पुरस्कार
  • २०१५मध्ये नेरळकरांना त्यांना दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. त्यानंतर, दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता.
  • २०१७मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • वसंतराव देशपांडे सन्मान पुरस्कार (सन २०१५)
  • नेरळकरांच्या नावाने बार्शीमध्ये एक संगीत प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयॊजिते.
  • 'पोटापुरते देई विठ्ठला, लै नाही लै नाही मागणं‘ या तुकारामरचित अभंगाला नेरळकरांनी भैरवी रागात चाल बांधली होती.
  • 'थोडा उजेड ठेवा,अंधार फार झाला, पणती जपून ठेवा,अंधार फार झाला ... या हिमांशु कुलकर्णीरचित आणि हेमा उपासनी यांनी गायिलेल्या प्रसिद्ध भावगीताचे संगीत नेरळकरांनी दिले होते.