नाईक (इंग्रजी : Naik) हे भारतीय आणि पाकिस्तानी सेनेतील एक पद आहे. तमिळ भाषेमध्ये नाईक शब्दाचा वापर राज्याच्या राज्यपालाच्या संदर्भात केला जातो.

भारतीय सैन्यामध्ये, नाईक हे लान्स नायक आणि हवालदार यांच्या मधले पद आहे. मराठा सैन्यामध्ये नाईक-सरनाईक ही पदे होती. ओरिसामध्ये नायक-पट्टनायक ही पदे होती. यांवरूनच ब्रिटिशांनी नाईक हा शब्द भारतीय सैनिकांच्या बाबतीतही उपयोगात आणला.