इमारतींमधील निरनिराळ्या उपयोगांकरिता केलेल्या नळव्यवस्थेसंबंधीचे काम म्हणजे नळकाम होय. अशी नळव्यवस्था सर्वसाधारणपणे रहात्या इमारतीमधून पाणीपुरवठ्याकरिता आणि पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्याकरिता असते. उद्योगधंद्याच्या ठिकाणी रसायने किंवा वायू वाहून नेण्यासाठीसुद्धा विशेष प्रकारची नळव्यवस्था केली जाते. अशा कोणत्याही नळव्यवस्थेत प्रत्यक्ष नळ, त्याला लागणारी जोडसाधने व जोडउपकरणे यांचा समावेश होतो. ज्या कार्यासाठी नळव्यवस्था आयोजित केली असेल ते कार्य व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही हे पाहणे व होत नसल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करणे, हे नळकऱ्याचे वा नळव्यवस्था योजकाचे काम होय. उद्योगधंद्याच्या ठिकाणी रसायने किंवा वायू वाहून नेण्यासाठीसुद्धा विशेष प्रकारची नळव्यवस्था केली जाते. अशा कोणत्याही नळव्यवस्थेत प्रत्यक्ष नळ, त्याला लागणारी जोडसाधने व जोडउपकरणे यांचा समावेश होतो. ज्या कार्यासाठी नळव्यवस्था आयोजित केली असेल ते कार्य व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही हे पाहणे व होत नसल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करणे, हे नळकऱ्याचे वा नळव्यवस्था योजकाचे काम होय.

नळकाम

नळकाममध्ये पाणी व इतर द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी नळ,पाईप्स, वाल्व्ह, टाक्या आणि इतर साहित्य जसे की जोडणीच्या ठीकाणी सॉकेट,L सॉकेट, T सॉकेट वापरली जातात. पिण्यायोग्य पाणीपुरवठा हा नळकामाचा सर्वात सामान्य उपयोग आहे.तसेच पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्यासाठी देखील नळकाम केले जाते. कारखान्यांमध्ये वायु,रसायने वाहुन नेण्यासाठी विषेश प्रकारची नळव्यवस्था केलेली असते.नळकाम सुरू करण्यापुर्वी आराखडा कडुन घेतात.नंतर आवश्यक मटेरिअलची यादी करून हे मटेरिअल जमा करून ठेवणे. नळकाम करताना सर्व जोडणी काट्कोनात व सरळ रेषेत केली जाते. नळकामात वापरण्यात येणारे साहित्य व साधने वेगवेगळ्या धातू किंवा पदार्थांपासून बनविलेली असतात. जी.आय.पाईप म्हणजे जस्ताचा थर दिलेला लोखंडी पाइप बांधकाम करताना आत वापरतात. कास्ट आयर्न म्हणजे ओतीव लोखंडी हे पाईप जास्त लांबीमध्ये मिळतात. जास्त दाब आणि बाह्य भार पेलू शकतात. हे मातीस गंज प्रतिरोधक असतात. पी.वी.सी. पाईप वजनाने हलके, टिकाऊ आणि सहज हातातून नेता येण्याजोगे असतात.

नळकामास वापरली जाणारी हत्यारे

संपादन

नळकऱ्याच्या कामामध्ये प्रामुख्याने नळ कापणे, जोडणे, इतर जोडसाधने बसविणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जस्तलेपित लोखंडी नळाच्या कामात लागणारी हत्यारे. या हत्यारांशिवाय काथ्या, हबक, सिमेंट शिसे इ. वस्तूही या कामात लागतात.

  • पाईप कटर: कमी श्रमात जलदरित्या पाईप कापण्यासाठी पाईप कटरचा उपयोग करतात. यातील कटिंग व्हील- हाय कार्बन स्टीलपासून, जबडे- बिडापासून तर इतर भाग स्टीलपासून बनवलेले असतात.
  • पाईप डायः पाईपला बाहेरून आटे पाडण्यासाठी डायचा उपयोग करतात. पाईप डायचे १) सॉलिड डाय २) अॅडजेस्टेबल डाय ३) रँचेट डाय असे तीन प्रकार पडतात.आपण यातील अॅडजेस्टेबल डाय सेटची माहिती घेऊया. यातील डायपीस हा हाय कार्बन बीडपासून तर इतर भाग माइल्ड स्टीलपासून, डायस्कॉट, बुश व कॉलर बिडापासून तर इतर भाग माइल्ड स्टील पासून बनवलेले असतात. अॅडजेस्टेबल डाय सेट १/२”, ३/४”, १” आणि १ ३/४”, १ १/२”, २” या मापात उपलब्ध असतात.
  • पाईप रेच: पाईपलाईनची जोडणी करताना पाईप किवा इतर उपांगे घटट् बसवताना जबड्यात पकडून फिरविण्यासाठी पाईप रेंचचा उपयोग करतात. पाईप रेंच फोजड स्टीलपासून बनवलेला असतो.

जोडकाम

संपादन

पाणीपुरवठ्याच्या नळांचे जोडकाम

संपादन

पाणीपुरवठ्याच्या नळकामात जस्तलेपित लोखंडाचे नळ प्रामुख्याने वापरतात. अशा नळांच्या जोडकामास लागणारी काही जोडसाधने आ. २ मध्ये दाखविली आहेत. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी होतो. आटे असणारे दोन नळ जोडण्यासाठी साधी शेंबी वा आंतरजोड वापरतात.एका नळातून दुसरा नळ काढण्यासाठी फाटे, वेगवेगळ्या व्यासाचे नळ जोडण्यासाठी लघुकारक शेंबी, वळणावर नळ फिरविण्यासाठी वाक वा कोपरे आणि नळाचे तोंड बंद करण्यासाठी बूच (प्लग) यांचा उपयोग केला जातो.वाकविण्याच्या सुलभतेमुळे नळकामात शिशाच्या नळांचाही उपयोग करतात. अशा प्रकारचे नळ जोडताना त्यातील एकाचे तोंड लाकडी निमुळत्या दट्ट्याने फाकवून त्यात दुसऱ्या नळाचे टोक आत सारून सांध्याच्या दोन्ही बाजूंस सर्व बाजूंनी शिशाचा पातळ झाळ ओतून तो गोल चोळून सांधा पक्का करतात. दुसऱ्या कोणत्याही धातूच्या नळाशी शिशाच्या नळाचा सांधा करताना शिशाच्या नळाचे टोक फाकवून त्यात दुसऱ्या नळाचे तोंड बसवून वरीलप्रमाणे सांधा करतात.

सांडपाण्याच्या नळांचे जोडकाम

संपादन

सांडपाणी वाहून नेण्यासाठी लोखंडी, चिनी मातीचे, सिमेंट व ॲस्बेस्टस सिमेंटचे नळ वापरतात. हे नळ आकारमानाने मोठे असतात. त्यांतून दाबयुक्त प्रवाह जात नसल्याने या नळांचे सांधे पाणीपुरवठ्याच्या नळासारखे पेचाचे नसतात. तरीही हे सांधे पूर्णतः झिरपमुक्त असणे जरूरीचे असते कारण सांध्यांमधून झिरपणारे सांडपाणी पाणीपुरवठ्याच्या नळव्यवस्थेत शिरून पाणी दूषित होण्याचा दाट संभव असतो. यासाठी असे नळ जोडताना त्याच्या सांध्यात सुतळी वा तागाने वेष्टण ओल्या सिमेंटमध्ये किंवा डांबरात बुडवून घट्ट बसवितात आणि शिवाय वरून ओले भिजविलेले सिमेंट फिरवून ते सर्व बाजूंनी बसवितात. हे सिमेंटचे सांधे एक आठवडा ओले ठेवल्याने भक्कम व झिरपमुक्त होतात.

चाचणी

संपादन

सर्वसाधारणपणे चिनी मातीच्या, सिमेंटच्या किंवा ॲस्बेस्टस सिमेंटच्या नळांकरिता घ्यावी लागते. असे नळ किती पाणी शोषून घेतात हे या चाचणीत पाहिले जाते. कोरड्या नळाचे वजन व काही वेळ पाण्यात भिजल्यानंतरचे वजन यांतील कमाल फरक २·५ सेंमी. जाडीच्या नळात ७%, ३·२ सेंमी. जाडीच्या नळात ८% व ३·८ सेंमी. जाडीच्या नळात ९% यापेक्षा जास्त असू नये.

संदर्भ[]

संपादन

[]

  1. ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2020-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Plumbing". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-06-06.