Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

नंदिनी ओझा, ओरल हिस्टरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या विद्यमान (2020-21) अध्यक्ष असून त्या संशोधक, लेखक, इतिहास-अभ्यासक  आणि कार्यकर्त्या आहेत[१]. मराठी आणि इंग्रजी भाषेतून त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांना संगम हाऊस, नृत्यग्राम, बंगलोर या  संस्थेची लेखकांसाठी असणारी प्रतिष्ठित ‘रायटर्स रेसिडेन्सी’ प्राप्त झाली.  नंदिनी सध्या नर्मदा आंदोलनाच्या मौखिक इतिहासावर काम करत आहेत. नर्मदा आंदोलनाच्या लढ्याचा मौखिक इतिहास लेख आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी मांडला आहे.[२]

नंदिनी ओझा

नंदिनी कन्हैयालाल ओझा (२५ जानेवारी १९६५, जामनगर, गुजरात )संपादन करा

चालू घडामोडी, आणि विवध विषयांवर त्या सतत लिहित असतात.[३][४][५][६][७][८] त्यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय इतिहासातील अपरिचित घटनांकडे लक्ष वेधलेले लिखाण केलेले आहे.[९] याचबरोबर सध्याच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी लिखाण केलेले आहे.[१०]

कौटुंबिक पार्श्वभूमी / माहिती:संपादन करा

नंदिनी ओझा यांची आई डॉ. अन्नपूर्णा ओझा या स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वडील दिवंगत श्री कन्हैयालाल के. ओझा हे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रमधून  जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. नंदिनी यांचे जीवनसाथी श्रीपाद धर्माधिकारी यांनी  आयआयटी, मुंबई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून पर्यावरण,  पाणी आणि ऊर्जा या प्रश्नांवर स्वतंत्र संशोधक म्हणून ते काम करतात. मंथन अध्ययन केंद्र या संस्थेचे ते प्रमुख आहेत.[२].

शैक्षणिक कारकीर्द

 • बी. कॉम महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा, १९८५.
 • एम.एस.डब्ल्यू (मास्टर्स इन सोशल वर्क) महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा, १९८७.

व्यावसायिक कारकीर्द

 • १९८७- ८८: कार्यक्रम आयोजक, आगाखान ग्रामीण साहाय्य कार्यक्रम (भारत)
 • १९९०-२००१: नर्मदा बचाव आंदोलनामध्ये कार्यकर्ता[११]
 • २००२–२००४:  व्याख्याता, सामाजिक कार्य विभाग, देवी अहिल्या विश्वविद्यालय, बडवानी, मध्य-प्रदेश  
 • 200४ पासून झिंदाबाद ट्रस्टच्या सचिव म्हणून कार्यरत.[१२] 
 • २००४ पासून गुजराथमधील नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर प्रकल्प नावाच्या महाकाय धरणाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या नर्मदा आंदोलनाच्या मौखिक इतिहासाचे दस्तावेजीकरण, लेखन आणि संगनिकीकरण करण्याच्या कामात कार्यरत.[२]

नंदिनी ओझा यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • २००६ : व्हिदर जस्टिस स्टोरीज ऑफ वुमेन इन प्रिजन, इंग्रजी,रूपा पब्लिकेशन्स.[१३]
 • २०१२: व्हिदर जस्टिस, मराठी मेहता प्रकाशन. या पुस्तकात भारतातील तुरूंगातील स्त्रियांवर एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप टाकलेला आहे.[१४]
 • २०१७: लढा नर्मदेचा, मराठी, राजहंस प्रकाशन .या पुस्तकात नर्मदा बचाव आंदोलनाचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते, केशवभाऊ वसावे आणि केवलसिंग वसावे, यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास लिहिला आहे.[१५][१६][१७]

संदर्भसंपादन करा

 1. ^ "Committee Members – Oral History Association of India" (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 2. a b c "Oral History Narmada – Oral Histories of the Narmada Struggle" (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 3. ^ "Nandini Oza". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत): 7–8. 2015-06-05.
 4. ^ "Nandini Oza : Exclusive News Stories by Nandini Oza on Current Affairs, Events at The Wire". The Wire. 2020-12-23 रोजी पाहिले.
 5. ^ "Nandini Oza | Scroll.in". Nandini Oza (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 6. ^ "नर्मदा बचाओ आंदोलन में अंतिम दम तक लड़ते रहे 'काका'". www.downtoearth.org.in (हिंदी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 7. ^ "Counterview". 2020-12-23 रोजी पाहिले.
 8. ^ "Nandini Oza, Author at RAIOT". RAIOT (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 9. ^ "History less known". nandinikoza.blogspot.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-26 रोजी पाहिले.
 10. ^ "This is what I Think". nandinioza.blogspot.com (इंग्रजी भाषेत). 2020-12-26 रोजी पाहिले.
 11. ^ Oza, Shripad Dharmadhikary & Nandini. "No, Swaminathan Aiyar, Adivasis ousted by the Narmada project aren't lovin' it. They are desperate". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 12. ^ "Nandini Oza |" (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 13. ^ Oza, Nandini (2006-06-01). Whither Justice: Stories of Women in Prison (English भाषेत). Rupa Publications India.CS1 maint: unrecognized language (link)
 14. ^ "WHITHER JUSTICE by NANDINI OZA". www.mehtapublishinghouse.com. 2020-12-23 रोजी पाहिले.
 15. ^ "Ladha Narmadecha". राजहंस प्रकाशन (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.
 16. ^ "'आम्ही लढणारे लोक आहे. अखेरपर्यंत लढू पण आम्ही मिळवू…'". www.aksharnama.com. 2020-12-23 रोजी पाहिले.
 17. ^ ऑनलाईन, सामना. "नर्मदेच्या लढ्याचा मौखिक इतिहास | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2020-12-23 रोजी पाहिले.