नंदा (अभिनेत्री)

(नंदा विनायक कर्नाटकी या पानावरून पुनर्निर्देशित)

नंदा (८ जानेवारी, इ.स. १९४१ - २५ मार्च, इ.स. २०१४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची कन्या होय. त्यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरू आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. हिंदीशिवाय त्यांनी मराठी चित्रपटांतही अभिनय केला.

नंदा
जन्म ८ जानेवारी, १९४१ (1941-01-08)
कोल्हापूर
मृत्यू २५ मार्च, २०१४ (वय ७३)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ इ.स. १९५६ - इ.स. १९८३
प्रमुख चित्रपट भाभी
जब जब फूल खिले
वडील विनायक दामोदर कर्नाटकी
आई सुशीला

बेबी नंदा यांनी इ.स. १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरून जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते.

अभिनेत्री नंदा यांचे गाजलेले चित्रपट

संपादन
  • अंगारें
  • अधिकार
  • अभिलाषा
  • अमर रहे यह प्यार
  • असलियत
  • आकाशदीप
  • ऑंचल
  • आज और कल
  • आशिक
  • आहिस्ता आहिस्ता
  • इत्तेफाक
  • उम्मीद
  • उसने कहा था
  • कातील कौन
  • कानून
  • काला बाजार
  • कुलदैवत (मराठी)
  • कैदी नंबर ९११
  • कैसे कहूॅं
  • गुमनाम
  • चार दिवारी
  • छलिया
  • छोटी बहन
  • जग्गू
  • जब जब फूल खिले
  • जरा बचके
  • जुआरी
  • जुर्म और सजा
  • जोरू का गुलाम
  • झालं गेलं विसरून जा (मराठी)
  • तीन देवियॉं
  • तूफान और दिया
  • दि ट्रेन
  • दिया और तूफान
  • दुल्हन
  • देव जागा आहे (मराठी)
  • देवघर (मराठी)
  • धरती कहे पुकारके
  • धूल का फूल
  • नया नशा
  • नया संसार
  • नर्तकी
  • नींद हमारी ख्वाब तुम्हारे
  • पती पत्‍नी
  • परिवार
  • पहली रात
  • प्रायश्चित्त
  • प्रेम रोग (हा शेवटचा चित्रपट!)
  • बडी दीदी
  • बंदी
  • बरखा
  • बेटी
  • बेदाग
  • भरती
  • भाभी
  • मझदूर
  • मंदिर (मराठी)
  • मातेविना बाळ (मराठी)
  • मेरा कसूर क्या है
  • मे्हंदी लगी मेरे हाथ
  • मोहोब्बत इसको कहते हैं
  • राजा साब
  • रूठा न करो
  • लक्ष्मी
  • वोह दिन याद करो
  • शंकराचार्य
  • शतरंज
  • शेवग्याच्या शेंगा (मराठी)
  • शोर
  • साक्षी गोपाल
  • हम दोनों

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन