ध्यानचंद सिंग

(ध्यानचंद या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ध्यानचंद सिंग (२९ आॅगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९) हे भारतीय हॉकी चे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो.

बालपणीचे जीवनसंपादन करा

ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.