धेनुगळ शिळा
धेनुगळ शिळा हा आयताकृती उभा दगड असतो. हा दगड पूर्वी दानपत्र करण्यासाठी वापरत असत. ह्या दगडावर वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. दगडाच्या मधोमध गाय, वासरू कोरलेले असते. दान दिलेल्या गावाची, जमिनीची हद्द दाखविण्यासाठी धेनुगळ शिळा वापरली जात असे.राजाचे प्रतिक गाय असे तर प्रजेचे प्रतिक वासरू असे. गाय जसे वासराचे पालन करते तसे प्रजेचे पालन राजा करतो हा सर्वमान्य अर्थ प्रचलित आहे.[१]
संदर्भ
संपादन- महाराष्ट्र टाईम्स शुक्रवार,५ मार्च २०२१.
- ^ महाराष्ट्र टाईम्स शुक्रवार,५मार्च २०२१