धूळपाटी/रशियन क्रांतीचे शिल्पकार

रशियाच्या राज्यक्रांतीचे तीन प्रमुख शिल्पकार म्हणजे लेनिन , टॉटस्की आणि स्टालिन हे होत.

लेनिन (१८७० - १९२४ ) : हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अनुयायी होता . १८९५ मध्ये त्याला पकडून सैबेरियात पाठविण्यात आले होते . १९०० साली त्याची सुटका झाली आणि तो स्वित्झर्लंडला गेला . त्याने इस्क्रा अथवा ठिणगी नावाचे एक समाजवादि वृत्तपत्र सुरू केले होते. ' ठीनगीपासून वणव्याकडे ' असे त्याचे बोधवाक्य होते. लेनिन हा जहालमतवादी होता. भांडवलशाहीशी कसलाही समझोता शक्य नाही असे त्याचे मत होते. १९१७ साली तो मायदेशी परत आला व आपले स्वप्न पूर्ण करण्याची त्याला संधी मिळाली. तो हुकुमशाह बनला, पण त्याची हुकुमशाही सामान्यजणांच्या हितासाठी होती . अधिकार पदावर आल्यानंतर सतत सात वर्ष अविश्रांत श्रम करून त्याने मृत्यू जवळ ओढवून घेतला. १९२४ साली तो मरण पावला. परंतु १९१७ ते १९२४ या त्याच्या छोट्याशा कारकिर्दीमुळे तो रशियाच्या आणि जगाच्या इतिहासात अमर झाला.