धूळपाटी/अथ सांवत्सर सुत्र व्याख्यास्याम

“अथ सांवत्सर सुत्र व्याख्यास्याम.” श्लोक (1 ते 12)

दैवज्ञाची लक्षणे

१)   सांवत्सर हा शब्द दोन प्रकारे वापरता येतो. एक सांवत्सर ते जे काल व ऋतुचे निवास स्थान आहे. ते परीवर्तन आहे.

२)   या सर्व परीवर्तनाचे ज्ञान असणा-या गुणांचे वर्णन या श्लोकात केले आहे.

अथ: सांवत्सरसूत्र व्याख्यास्याम:तत्र सांवत्सरो∙भिजात: प्रियदर्शनो विनीतवेष: सत्य्‍वागनसूयकः

सम:सुसंहितोपचितगात्रसन्धिरविकलश्चारुकरचरणनखनयन‍‍चिबुक- दशनश्रवणललाटभ्रुत्तमाडगो वपुष्मान गम्भारोदात्तघोष्:प्राय शरीराकारानुवर्तिनो ही गुणा दोषाश्च भवन्ति ।।1।।

३)   दैवज्ञ हा बुदिमान, अभिजात म्हणजे उत्तम घराण्यात जन्मलेला आकर्षक व्यक्तीमत्वाचा, विनीतवेष, म्हणजे नर्म्र पोषाख घातलेला सत्य भाषण करणारा. दुस-याच्या यशाचे खुल्या दिलाने स्वागत करणारा दुस-याचे गुणदोष न काढणारा श्रेष्ठ लक्षणे असलेली नखे, हातपाय व पुष्ट शरीराचा दैवज्ञ असावा

४)   राग, व्देश, यश, अपयश यामध्ये समान शारीरिक व्याधी रहीत प्रगल्भ वाणी आणि स्पष्ट उच्चारण क्षमता असलेला असायला हवा.

५)   बोलायला गंभीर व उदात्त ज्योतिषी असावा.

तत्र गुणा: । शुचिर्दक्ष: प्रगल्भो वाग्मी प्रतिभानवान्र देशकाल   वित सात्त्विको न पर्षभ्दीरु: सहाध्यायिभिरनभिभवनीयः     कुशलो∙व्यसनी शान्तिकपौष्टिकाभिचारस्नानविदयाभिज्ञो     विबुधार्चनव्रतोपवासनिरत: स्वतन्त्राश्चर्योत्पादितप्रभाव: पष्टाभिधाय्य्‍न्य्‍त्र दैवात्ययात ।     ग्रहगणितसंहिताहोराग्रन्थार्थवेत्तेति ।। 2 ।। 

   पवित्र, चतुर, सभेत बोलणारा वाचाळ, प्रतीभाषाली, देशकाल जाणणारा, निर्मल चित्त, सभामध्ये निर्णय, सहपाठी लोकांपासुन पराजय न पावणारा. वेदमंत्र, उत्पातांना शांत करण्यासाठी मंत्र जाणणारा, देवपुजा उपवास यामध्ये सदैव राहणारा, गणित संहिता होरा याचे ज्ञान असणारा असा दैवज्ञ असला पाहिजे. कुशल, निर्व्यसनी दैवज्ञ असला पाहिजे. आपल्या भाषणातून आश्चर्यजनक विषय आणून प्रभाव वाढवणारा व न विचारता शांती कर्म सांगणारा दैवज्ञ असावा.

।। दैवज्ञाचे लक्षण्‍।।

तत्र ग्रहगणिते पौलिशरोमकवासिष्ठसौरपैतामहेषु पंचस्वेतेषु सिदधान्तेषु युगवर्षायनर्तुमासपक्षाहोरात्रयाममुहूर्तनाडी प्राणत्रुटीत्रुटयादयवा    दिकस्य कालस्य क्षेत्रस्यच वेत्ता ।। 3 ।।

ग्रह गणित विभागात पौलिष, रोमक, वासिष्ठ, सौर पैतामह या  पाच सिद्धांतात प्रवीण जो कालानुसार सिदधांताचे ज्ञान असणारा ज्योतिषी असावा.

युग, वर्ष, अयन, ऋतु, मास, पक्ष्, अहोरात्र, प्रहर, मुहूर्त, घटी, पळे, प्राण, त्रुटी, भ्गण, अंश, कला, विकला, यांचे ज्ञान असणारा दैवज्ञ असावा.

युगमान

432000 वर्ष – कलीयुग

432000 x २ – दवापारयुग

432000 x ३ – त्रेतायुग

432000 x ४ – सत्ययुग

कालविभाग प्रमाण

१ निमेष – ०.५३ सेकंद

२ निमेष – १ त्रुटी

२ त्रुटी – १ लव

२ लव – १ क्षण

१० क्षण – १ काष्ठ (सेकंद)

१० काष्ठ – १ कला

१० कला – १ नाड

२ नाड – १ मुहूर्त

६० मुहूर्त – १ अहोरात्र

३० अहोरात्र – १ तास

१२ तास – १ वर्ष

६० तत्पर – १ विकला

६० विकला – १ कला

६० कला – १ अंश

३० अंश – १ रास

१२ रास – १ भगण

।। रवेष्चर्कभोगाअर्कवर्ष प्रदिष्टम् ।।

अयनज्ञान

उदगयनं मकरादाव़तव: शिशिरादयश्च्‍ सुर्यवशात ।।

व्दिभवनकालसमाना दक्षिणमयनंच कर्कटकात् ।।

सौरवर्ष प्रमाण

रविला १ भोगायला लागणारा वेळ म्हणजे १ सौर दिन

३० सौर दिन – १ मास

१२ सौर मास – १ सौर वर्ष- ३६५.२५ दिवस

सावन मान

सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंतचा काळ १ सावन दिन

३० सावन दिन – १ सावन मास

१२ सावन मास – १ सावन वर्ष

नक्षत्र मान

चंद्राचे एक नक्षत्र भोग काळ म्हणजे एक नक्षत्र दिन

२७ नक्षत्र भ्रमण – १ नक्षत्र मास

१२ नक्षत्र मास – १ नक्षत्र वर्ष

चांद्रामास

चंद्र सुर्याच्या १२ अंश समोर गेला कि १ तिथी होते.

३० तिथी – १ चांद्रमास

१ सौर वर्ष – ३६५.२५ दिवस

१ चांद्र वर्ष – ३५४.२५ दिवस

मकर आदि सहा राशीत उत्तरायण व कर्क आदि राशीत दक्षिणायन होते. यानुसार ऋतु होतात.

मकर कुंभ – शिशिर ऋतु

मीन मेष – वसंत

व़ष मिथुन – ग्रीष्म

कर्क सिंह – वर्षा

कन्या तुळ – शरद

व़श्चित धनु – हेमन्त

हे दैवज्ञाला माहित असावे.

चतुर्णाचंमानानांसौरसावननाक्षत्रचान्द्राणामधिमासकावमसम्भ्वस्यच कारणाभिज्ञ:

सौर, सावन नक्षत्र, चांद्रा हे चार मास, अधिक व क्षय मास यांच्या उत्पत्तीचे कारण माहित असणारा दैवज्ञ असावा.

षष्टयब्दयुगवर्षमासदिनहोराधीपतीनां प्रतीपत्तिच्छेदवित   ॥   

प्रथम आदि साठ संवत्सर मास दिन होरा यांचे अधिपतीचे आगमन व निव़त्ती यांचे दैवज्ञाना ज्ञान असावे.

सौरादिनांच मानानासद़शसद़शयोग्यायोग्य्‍त्वप्रतीपादनपट़: ॥ ६ ॥

   अनेक शास्त्रांमध्ये दिलेल्या सौर आदि मानामध्ये यथार्थ व अयथार्थचा विचार करणारा दैवज्ञ असायला हवा.

   सिदधांतभेदे∙प्ययननिव़तौ प्रत्यक्षसममण्डललेखा   सम्प्रयोगाभ्युनदितांशकानां छायाजलयन्त्रद़ग्गणितसाम्येन प्रतिपादनकुशल: ॥ ७ ॥

   सिद्धांत सौर मानामध्ये भेद, अयनविव़त्तीचे भेद, छाया जल यंत्र याचासुत द्यगणीतैक्य याला जाणणारा कुशल दैवज्ञ असावा.

सूर्यादीनांच ग्रहाणां शिघ्‍ मंदयाम्योत्तरनीचोच्चगति कारणाभिज्ञ: ॥ ८ ॥

   सूर्य आदि ग्रहांच्या शिघ्र मंद/दक्षिण उत्तर/उच्च निच गतीचे कारा जाणणारा दैवज्ञ असावा. 

   सूर्याचन्द्रमसोश्च ग्रहणे ग्रहणादिमोक्षकालदिकप्रमाण-  स्थितीविमर्दवर्णा देशानामनागतग्रहसमागमयुदधानामादेष्टा    ॥ ९ ॥

   सुर्यचंद्र ग्रहण, स्पर्श मोक्ष, स्थिती, विभेद भावी ग्रह युती व युद्ध जाणणारा दैवज्ञ असावा.

   प्रत्येकग्रहभ्रमणयोजनकक्ष्याप्रमाणप्रतीविषययोजनपरिच्‍छेद   कुशल:॥१०॥

   प्रत्येक ग्रहाचे योजनात्मक कक्षा प्रमाण व देशांतर जाणणारा दैवज्ञ असावा.

भूभगण भ्रमण संस्थानादयक्षावलंम्बकाहर्व्यासचर दलकाल राश्युदयच्छायानाडीकरणप्रभ़तिषु क्षेत्रकालकरणैष्वभिज्ञ: ॥ ११ ॥

 प़थ्वी नक्षत्राचे भ्रमण अक्षांश/रेखांश/लंबांश/छाया/नाडी करण यांना जाणणारा दैवज्ञ असावा.

नानाचोदयप्रश्न्‍भदोपलब्धिजनितवाक्रसारो निकषसन्तापाभिनिवेशै:

कनकस्येवाधिकतरममलीक़तस्य शास्त्रस्य वक्ता तन्त्रेज्ञो भवति१२

   दैवज्ञ नाना कसौटी व अग्नीने परिक्षित ख-या  सोन्यासारखा, शुद्ध-शास्त्र वक्ता अनेक प्रकारच्या प्रश्नदांना जाणणारा दैवज्ञ असावा.

संदर्भ बृहदसंहिता (वराहमिहिर वीरोचित) लेखक-पंडित अच्युतआनंद झा प्रकाशन-चोखंबा प्रकाशन वाराणसी