धूलिकण म्हणजे धुळीचे कण. (इंग्रजी Dust storm aka sandstorm [१]) पृथ्वीच्या वातावरणात धुळीचे कण असतात. वातावरणात तरंगणारे जलबिंदू व धूलिकण यांच्यामुळे इंद्रधनुष्य, चंद्राला व सूर्याला पडणारी खळी, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर क्षितिजावर दिसणारे मनोवेधक रंग इ. सौंदर्यंपूर्ण आविष्कार आपल्याला पृथ्वीवरून पहावयास मिळतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण वाढल्यास आपल्याला दमा आणि श्वसनाचे विकार होऊ शकतात.

धूळ थेट सौदी अरेबियाच्या वाळवंटामधून अरबी समुद्र ओलांडून गुजरात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात पोहोचली असून सोमवारीही त्याचा प्रभाव कायम राहील. मात्र या ‘धुळवडी’चा स्थानिक हवामानावर परिणाम होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

नैर्ऋत्येकडून आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे बुधवारी १ एप्रिल २०१५ रोजी सौदी अरेबिया, बाहरिन, कतार, दुबई आणि कुवैतला धुळीच्या प्रचंड वादळाचा तडाखा बसला.

तीन वर्षांपूर्वी..

*२१ मार्च २०१२ रोजी अशा रीतीने प्रचंड धूळ मुंबईत आली होती. राजस्थानमधील धुळीची वादळे गुजरात तसेच दिल्लीपर्यंत पोहोचतात.

*कधी कधी त्याचा प्रभाव मुंबईतही दिसत असल्याने ही धूळ याच प्रकारातील असेल, असे हवामानतज्ज्ञांना वाटले होते.

*उपग्रहातून काढलेल्या छायाचित्रांमुळे त्यावेळी ही धूळ अरबी समुद्राच्या पलिकडून आल्याचे स्पष्ट झाले.  

*ओमानवरून आलेल्या या वादळाचा मुख्य मार्ग गुजरात, राजस्थानपासून उत्तरेकडे होता. मात्र या मुख्य मार्गाहून काहीशा बाजूला असलेल्या मुंबईवरही दोन दिवस या धुळीचा प्रभाव होता.[२]


हे सुद्धा पहा संपादन

वायुप्रदूषण

संदर्भ यादी संपादन

  1. ^ "Dust storm". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-04.
  2. ^ "सौदीतील वादळाने राज्यात धुळीचे लोट". Loksatta. 2019-09-05 रोजी पाहिले.