दीक्षित धुंडिराज गणेश बापट वाजपेययाजी (जन्म, पाचवड-सातारा जिल्हा : १५ नोव्हेंबर, १८८२; मृत्यू, पुणे : १३ फेब्रुवारी १९५६) हे एक वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार व यज्ञप्रधान वैदिक धर्माचा परिचय करून देणारे भाष्यकार होते. यांच्या घराण्यात सात पिढ्यांपासून अग्निहोत्राची आणि प्राचीन संस्कृत वेदविद्येच्या अध्ययन-अध्यापनाची परंपरा होती. धुंडिराज बापट यांनी ती परंपरा पुढे चालू रहावी म्हणून सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे ’स्वाध्याय मंदिर’ ही संस्था स्थापन केली, आणि त्यासाठी ’स्वाध्याय’ हे मासिक १९२० ते १९२२पर्यंत चालविले.

डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडातील ’वेदविद्या’ विभाग लिहिण्यात धुंडिराज गणेश बापटांचा मोठा सहभाग होता. त्यांनीच वैदिक संशोधन मंडळाच्या श्रौतकोशाचे(’श्रौतयज्ञानुषंगिवचनसंकलनरूपः श्रौतसूत्रानुवादरूपश्च’चे) संपादन केले आहे. धुंडिराज बापटांनी लिहिलेल्या सर्वच भाषांतरित ग्रंथांत, शब्दशः भाषांतराबरोबरच मूळ ग्रंथांतल्या कल्पना सुबोध भाषेत स्पष्ट करून दाखविल्या आहेत.

श्रौताचार्य धुंडिराज गणेश बापट यांची ग्रंथसंपदा

संपादन
  • आर्यांचे संस्कार
  • ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांचे भाषांतर
  • कृष्ण यजुर्वेद भाग १ तैत्तिरीय संहिता
  • कृष्ण यजुर्वेद भाग २ तैत्तिरीय ब्राम्हण व आरण्यक
  • गणपतिअथर्वशीर्ष
  • वैदिक राष्ट्रधर्म
  • शुक्ल यजुर्वेद संहितेचे मराठी भाषांतर