धर्मस्थळ
धर्मस्थल हे भारतातील एक हिंदू मंदिर आहे.[१] नेत्रावती नदीच्या किना-यावर बेलथांगडी तालुक्यात,दक्षिण कर्नाटक जिल्ह्यात, मंगलोर जवळ हे मंदिर स्थित आहे. मंजुनाथ या स्थानिक दैवताचे हे मंदिर आहे.[२]
इतिहास
संपादनशिव अथवा शंकर या देवतेचे मंजुनाथ हे एक रूप मानले जाते.या मंदिरातील शिवलिंग मंगळूर शहराजवळील कद्री मंजुनाथ मंदिर येथून धर्मस्थल येथे आणले गेले आहे अशी आख्यायिका प्रचलित आहे. अण्णाप्पा यांनी आपल्या गुरूला पूजा अर्चा करण्यासाठी हे शिवलिंग या ठिकाणी आणून स्थापित केले असे मानले जाते.[३] या घटनेनंतर अण्णाप्पा हे अंतर्धान पावले अशीही स्थानिक श्रद्धा आहे.[४]
विशेष उत्सव
संपादनतुळू दिन दर्शिकेनुसार सुग्गी महिन्यात साज-या होणा-या पुरुसेरे कत्तुना या लोककलाप्रकारात मंजुनाथ देवतेची पूजा करण्यात येते.
संदर्भ
संपादन- ^ "Sri Manjunatha Temple | Dharmasthala". Karnataka Tourism (इंग्रजी भाषेत). 2023-05-27 रोजी पाहिले.
- ^ Long, Roger D. (2004). Charisma and Commitment in South Asian History: Essays Presented to Stanley Wolpert (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 978-81-250-2641-9.
- ^ Harper, Malcolm; Parekh, Nadiya (2021-09-30). Social Enterprise: Cases and Analysis for Understanding Social Business (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-000-44878-8.
- ^ GANGASHETTY, RAMESH (2019-10-30). THIRTHA YATRA: A GUIDE TO HOLY TEMPLES AND THIRTHA KSHETRAS IN INDIA (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-68466-134-3.