धनको हा दुसऱ्याला कर्जाने पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था होय. सावकार, बँक, पतपेढी ही धनकोची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनकोचे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक ही ऋणको म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.