द डिस्कव्हरी ऑफ इंडिया

द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९४२-४५ मध्ये लिहलेले एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीच्या काळात महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिले होते.[]

द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
लेखक पंडित जवाहरलाल नेहरू
भाषा इंग्लिश, हिंदी
देश भारत
प्रकाशन संस्था मेरिडियन बुक्स
प्रथमावृत्ती १९४६
पृष्ठसंख्या ४९८

१९४४ मध्ये लिहिले गेले पण १९४६ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाचा प्रवास प्राचीन इतिहासापासून सुरू होतो आणि ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या वर्षांपर्यंत चालू राहतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी उपनिषद, वेद आणि प्राचीन इतिहासावरील पाठ्यपुस्तकांच्या ज्ञानाचा उपयोग करून वाचकांना सिंधू संस्कृतीपासून भारताच्या विकासाची ओळख करून दिली आहे. प्रत्येक परकीय आक्रमणकर्त्याने भारताच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत आणलेल्या बदलांद्वारे त्यांनी भारताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास केला आहे.[]

नेहरूंना इतर भारतीय नेत्यांसह भारत छोडो आंदोलनात सहभागासाठी तुरुंगात टाकण्यात आले. त्यांनी या वेळेचा उपयोग भारताच्या इतिहासाबद्दल त्यांचे विचार आणि ज्ञान लिहिण्यासाठी केला. तुरुंगवासात त्यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नेहरूंनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयाच्या नजरेतून भारतीय इतिहास, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे विस्तृत दृश्य प्रदान केले आहे.

नेहरूंनी त्यांच्या लेखनातून सिंधू संस्कृतीपासून सुरू होऊन वेद, उपनिषद, महाकाव्ये, बौद्ध आणि जैन धर्म, इस्लाम आणि मुगल साम्राज्य, तसेच ब्रिटिश राजवटीपर्यंतचा प्रवास उलगडला आहे. त्यांनी भारताच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचा विचार करून प्रत्येक काळातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला आहे. व भारतातील प्रत्येक परकीय आक्रमणकर्त्याने घडवलेल्या सामाजिक-राजकीय परिस्थितीतील बदलांचे सखोल निरीक्षण मांडले आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून नेहरूंनी भारताच्या इतिहासातील विविध टप्प्यांवर प्रकाश टाकला आहे आणि त्याचा प्रभाव आजच्या भारतावर कसा पडला आहे हे सांगितले आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये नेहरूंचे विचार, त्यांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास आणि संस्कृतीचे महत्त्व उलगडून सांगितले आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nehru's 'Discovery of India' remains a bestseller 50 years after his death | Mumbai News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. ^ "Bharat Mata Ki Jai: How Jawaharlal Nehru's Discovery of India offers a peek into the soul of India-India News, Firstpost". Firstpost. 29 October 2016.
  3. ^ Nehru, Jawaharlal (2008-02-01). Discovery of India (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-85990-05-2.