द्वैत

(द्वैतवाद या पानावरून पुनर्निर्देशित)

द्वैत दोन भागांची अवस्था दर्शविते. ज्ञानमीमांसा व तत्त्वज्ञानात अद्याप जिवंत असणारा सह-शाश्वत द्विध्रुवी विरोध हा अर्थ दर्शविण्यासाठी 'द्वैत' ही संज्ञा मूलतः वापरली गेली होती. आधुनिक काळात मात्र नैतिक द्वैत (चांगले व वाईट यामधील संघर्ष), मन-काया किंवा मन-द्रव्य द्वैत (उदाहरणार्थ कार्टेसिअन द्वंद्व) किंवा भौतिक द्वैत (चिनी यिन व यांग) असा द्वैताचा अर्थ असू शकतो. द्वैत अस्तित्वाचे दोन मुलभूत भाग (भौतिक आणि आध्यात्मिक) आहेत असे मानते.