द्विमान पद्धत
(द्विमान पद्धती या पानावरून पुनर्निर्देशित)
दशमान पद्धत | द्विमान पद्धत |
० | ० |
१ | १ |
२ | १० |
३ | ११ |
४ | १०० |
५ | १०१ |
८ | १००० |
१६ | १०००० |
५० | ११००१० |
या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करून लिहिल्या जातात. त्यामुळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किंमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान संख्येची फोड : १*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूपांतर करणे सोपे आहे. १००११० या द्विमान संख्येचे रूपांतर १*२५ + ०*२४ + ०*२३ + १*२२ + १*२१ + ०*२०
= ३२ + ४ + २ = ३८ (दशमान) असे होते.
हे सुद्धा पहा