भौतिकशास्त्रात द्रव्याची अवस्था म्हणजे द्रव्याने धारण केलेला विशिष्ट आकार होय.

प्रामुख्याने, द्रव्याच्या ४ अवस्था असतात.

  1. घन 
  2. द्रव 
  3. वायू 
  4. आयनद्रायू (प्लाझ्मा)

याशिवाय इतर काही अवस्थांचाही शोध लागलेला आहे. या अवस्था नैसर्गिकरीत्या अभावानेच आढळतात परंतु प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणात संभवतात. यात बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट, न्यूट्रॉन डीजनरेड, इ.चा समावेश आहे.

द्रव्याच्या मुख्य ४ मूलभूत अवस्था

संपादन

घन अवस्था

संपादन

घन पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या खूप जवळ असतात. जेवढे रेणू जवळ जवळ तेवढा पदार्थ जास्त कठीण असतो. घन पदार्थांना स्वतःचा आकार असतो. घन पदार्थांचे कण एकमेकांपासून फारसे हलू शकत नाही कारण हे कणबलामुळे एकमेकांशी जोडले गेलेले असतात. हा घन पदार्थांचा भौतिक गुणधर्म आहे.

द्रव अवस्था

संपादन

द्रव पदार्थ अस्थिर असतात, कारण त्यांचे कण स्थलांतरे करतात. जेव्हा घन पदार्थांला उष्णता दिली जाते, तेव्हा घन पदार्थ वितळून तो द्रव अवस्थेत संक्रमित होतो. उष्णते मधील उर्जा वापरून कणांची अंतरे वाढतात, म्हणून द्रवामध्ये कणांतील अंतरे ही घनामधील कणांतील अंतरापेक्षा जास्त असतात. कणांतील ह्या अंतरामुळे द्रवाला प्रवाहीपणा प्राप्त होतो.

वायू अवस्था

संपादन

वायू पदार्थ खूप अस्थिर व प्रवाही असतात, कारण त्यांचे कण खूप स्थलांतरे करतात (द्रव पदार्थांपेक्षा अधिक). द्रव पदार्थ जर त्याच्या उकळबिंदूपर्यंत तापविला तर त्याचे बाष्पात रूपांतर होते. या रूपांतरात पदार्थाच्या आयतनात सु. १,००० पट किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढ होते. कणांमधील अंतर वाढल्यामुळे कणांमधील आकर्षण जवळजवळ नष्टच झाल्यासारखे होते, म्हणून वायू पदार्थांमधील कण एकमेकांपासून लांब जातात. ह्यामुळे वायू पदार्थ उपलब्ध असलेल्या भांड्याचे पूर्ण आयतन वापरतात.

आयनद्रायू अवस्था

संपादन

बाह्य दुवे

संपादन