दोहा (छंद)

हिंदी भाषेतील मात्रा वृत्त
(दोहा(छंद) या पानावरून पुनर्निर्देशित)

दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये १३ आणि सम क्रमांकाच्या चरणांत ११ मात्रा असतात. विषम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण ( । ऽ ।-- लघुगुरूलघु ) असू नये. सम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरू आणि शेवटचे अक्षर लघु असणे आवश्यक आहे.

सोरठा हा छंद दोह्याच्या अगदी विरुद्ध असतो. त्याच्या विषम क्रमांकाच्या ओळीत ११ आणि सम क्रमांकाच्या ओळीत १३ मात्रा असतात. दोहा हा काव्यरचनेचा एक प्रकार आहे. संत कबीर यांनी त्यांची सर्व रचना या प्रकारात केली आहे. या प्रकारातील 'बीजक' हा त्यांचा एकमेव ग्रंथ आहे. याचे संपादन शिष्य धर्मदास यांनी केले आहे.


दोह्याचे उदाहरण -

मुरली वाले मोहना,
मुरली नेक बजाय ।
तेरी मुरली मन हरो,
घर ॲंगना न सुहाय॥

सोरठाचे उदाहरण -

जो सुमिरत सिधि होय,
गननायक करिबर बदन।
करहु अनुग्रह सोय,
बुद्धि रासि सुभ गुन सदन॥