देवचंद कॉलेज अर्जुननगर व्हाया निपाणी

देवचंद कॉलेज, अर्जुननगर सुवर्ण ग्रंथालय महाराष्ट्र कर्नाटक सीमा परिसरात विशेषतः निपाणी भागात उच्च शिक्षणासाठी महाविधालायाची गरज लक्षात घेऊन व शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सन १९६० साली पद्मभूषण सन्माननीय देवचंदजी शाह यांनी देवचंद कॉलेजची स्थापना केली व विध्यर्थ्याला अभ्यासासाठी सुविधा करिता ग्रंथालय स्थापन झाले आज ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत असून एकूण ६० हजार ग्रंथा बरोबर विविध विषयांची नियतकालिके वृतपत्रे, ग्रंथेतर साहित्य उपलब्ध आहे. क्रमिक पुस्तकाबरोबर संदर्भ ग्रंथ, विविध ज्ञानकोश, ई बुक्स, ई जर्नलस ही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे दुर्मिळ ग्रंथ संपदा, महात्मा गांधी यांचे सबांधी साहित्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, विल्यम शेक्सपिअर. मराठी भाषेतील खंड उपलब्ध आहेत. ग्रंथालयामार्फत प्रसंगानुरूप वाचनवृद्धीसाठी उपक्रम राबविले जातात. विध्यार्थायाबारोबर इतर माजी विधायार्थी, शिक्षक यांनाही सभासदत्व दिले जाते जेणेकरून वृद्धी बरोबर विकासास हातभार लागेल.