देवक ही एक देवकल्पना आहे. अनेक अनार्य जाती-जमाती आणि द्रविड वंशातील काही लोक यांच्यात पशुपक्षी, वृक्ष वनस्पती यांची नावे कुळाना देण्याची प्रथा आहे. ज्या प्राण्याचे किंवा वस्तूचे नाव कुळाला मिळाले असेल तो प्राणी किंवा वस्तू त्या कुलाचे देवक मानले जाते. देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा गूढ ऋणनुबंध असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते. ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हे तर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नाहीत. तसेच देवक मानलेल्या वृक्षाची पाने, फळे, फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत किंवा त्या वृक्षाच्या सावलीतही बसत नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की त्याचे सुतक पाळतात.[१]

प्राचीनत्वसंपादन करा

देवकाची कल्पना सर्व जगात प्रचलित आहे, असे काही पंडित मानतात. केवळ आदिवासी लोकच नव्हेत ते सेमेटिक, आर्य, इजिप्शीयन हे लोकही देवक मानीत होते असे त्यांचे मत आहे. मोहेंजोदडो येथील प्राचीन अवशेषातही देवकपूजेची लक्षणे काही अभ्यासकांना आढळली आहेत.[२]

साहित्यातील महत्त्वसंपादन करा

रामायणात ज्या वानरांचे वर्णन केले आहे ते पशू नसून मानवच होते, वानर हे त्यांचे देवक होते असे म्हणतात. आजही भारतात हनुमान व जांबवान यांना आपले पूर्वज मानणारे लोक आहेत. महाभारतात तर अशी असंख्य नावे आढळतात. उदा. उलूक, नाग, सुपर्ण इ.

समजुतीसंपादन करा

खाद्य पदार्थाना देवक मानल्यावर ते पदार्थ खाता येत नाहीत. मग त्याचा पर्याय शोधून काढला जातो. भात हे ज्यांचे देवक असते ते लोक भाताची पेज काढल्यावर तिच्यावर येणारी साय खात नाहीत. मीठ ज्यांचे देवक असते ते लोक नुसते मीठ खात नाहीत, तर ते इतर पदार्थात मिसळून खातात. लोख्न्दाला(?) देवक मानणारे लोक त्याला जिभेने स्पर्श करीत नाहीत.[३]***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

देवासारखा. पूजनीय परंतु ज्याचे देवाइतके व्यापक माहात्म्य मानले जात नाही, असा पदार्थ म्हणजे देवक होय. कुलचिन्ह, कुलनाम, कुलाच्या पूर्वजाचे नाव व कुलाला पूज्य वाटणाऱ्या वस्तूचे नाव अशा विविध रूपांत देवक मानले जाते. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, मेलानीशिया बेटे इ. प्रदेशांतील आदिम जमातींत ही प्रथा आढळते. काही प्रगत समाजांतही देवकप्रथेचे अवशेष आढळत असले, तरी ही प्रथा प्रामुख्याने आदिवासी धर्मकल्पनेचा एक भाग आहे. देवक मानणारे लोक देवकाबरोबर आपला गूढ व विशेष असा रक्तसंबंध आहे, असे मानतात. देवकापासून आपल्या वंशाची निर्मिती झाली असे मानणे, स्वतःला व आपल्या कुलाला देवकाचे नाव लावणे, देवकप्राण्याचा वध अथवा भक्षण निषिद्ध मानणे, एकच देवक असलेल्या स्त्रीपुरुषांनी आपापसांत विवाह न करणे इ. आचारविशेष या लोकांत दिसून येतात; परंतु कोणत्याही एका समाजात देवकप्रथेची सर्व वैशिष्ट्ये एकत्र आढळत नाहीत. शिवाय, प्रगत समाजाप्रमाणेच आदिम जमातींतही काळाच्या ओघात अनेक बदल झाले असल्यामुळे त्यांच्यात आढळणाऱ्या देवकप्रथेची कोणती वैशिष्ट्ये मूळ स्वरूपात राहिली आहेत व कोणती बदललेल्या स्वरूपात आपल्यापुढे आली आहेत हे सांगणे कठीण आहे.

एखादा मानवेतर प्राणी किंवा एखादी वनस्पती यांना देवक मानण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आढळते. कित्येकदा एखादी नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तूही देवक मानली जाते. काही देवके पुढीलप्रमाणे : देवक प्राणी–सिंह, वाघ, कुत्रा, हत्ती, डुक्कर, कांगारु, लांडगा, कासव, बेडूक, नाग, बगळा, मोर, कावळा, घुबड, पोपट, कोंबडा, कबूतर इत्यादी. देवक वनस्पती–जांभूळ, वड, उंबर, बोर, चिंच, आंबा, अमरवेल इत्यादी. देवक नैसर्गिक वस्तू–वारा, तारा, ढग, पाऊस, पाणथळ इत्यादी. देवक कृत्रिम वस्तू-कट्यार, तलवार, कुऱ्हाड, लोखंड इत्यादी.

***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले


बाह्य दुवेसंपादन करा