दृष्टी (चित्रपट)
दृष्टी हा १९९० चा गोविंद निहलानी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, ज्यात डिंपल कपाडिया, शेखर कपूर आणि इरफान यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात मुंबईतील उच्च-वर्गीय वातावरणातील शहरी जोडप्याचे वैवाहिक जीवन आणि त्यांच्यातील क्लेश, घटस्फोट आणि अनेक वर्षांच्या विभक्त झाल्यानंतरची भेट यांचे चित्रण केले आहे.[१]
1990 film by Govind Nihalani | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे संगीत दिग्दर्शन असलेला हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे गीत वसंत देव यांचे आहेत. १९९१ मध्ये, ३८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला, आणि ५५ व्या बंगाल चित्रपट पत्रकार संघाच्या पुरस्कारांमध्ये ५ व्या सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा दर्जा प्राप्त झाला. ह्यात डिंपल कपाडिया आणि मीता वसिष्ठ यांना हिंदी विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.[२][३][४]
पात्र
संपादनकलाकार सदस्य खाली सूचीबद्ध आहेत: [५]
- संध्या - डिंपल कपाडिया
- निखिल - शेखर कपूर
- प्रभा - मीता वसिष्ठ
- राहुल - इरफान खान
- रमेश - विजय कश्यप
- रेवती - नीना गुप्ता
- गीता - नवनीत निशाण
संदर्भ
संपादन- ^ Sharma, Deven (8 June 2020). "Filmfare recommends: Best films of Dimple Kapadia". Filmfare (इंग्रजी भाषेत). 25 October 2020 रोजी पाहिले.
- ^ Raj, Ashok (2009). Hero Vol.2 (इंग्रजी भाषेत). Hay House, Inc. p. 205. ISBN 978-93-81398-03-6.
- ^ Dhawan, M. L. (17 November 2002). "Year of filmi masterpieces". The Tribune. 24 October 2020 रोजी पाहिले.
- ^ Rangarajan, S. (1993). "1993 National Film Awards". Frontline. Vol. 10 no. 1–9. The Hindu Group. p. 99.
- ^ Arunachalam, Param (2019). BollySwar: 1991 – 2000 (इंग्रजी भाषेत). Mavrix Infotech Private Limited. p. 35. ISBN 978-81-938482-1-0.