दूर शिक्षण

(दूरस्थ शिक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)

दूर शिक्षण

संपादन

भारतातील स्थिती : सन १९६१ मध्‍ये भारत सरकारच्‍या शिक्षणविषयक केंद्रीय सल्‍लागार मंडळानं केलेल्‍या शिफारशींनुसार भारतात दूरशिक्षण सुरू झालं. शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. डी. एस. कोठारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नेमण्‍यात आलेल्‍या आयोगानं या शिफारशींवर विचार केला. १९६२ मध्‍ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सल्ल्‍यानुसार दिल्‍ली विद्यापीठानं पत्राचार अभ्‍यासक्रम आणि दूरशिक्षण संचालनालय सुरू केलं. पुढे त्‍याचं नाव स्‍कूल ऑफ करस्‍पॉंडन्स कोर्सेस ॲण्ड डिस्‍टन्स एज्‍युकेशन असं करण्‍यात आलं. बराच कालावधी लोटल्‍यानंतर म्‍हणजे १९८३ मध्‍ये आंध्र प्रदेशात मुक्‍त विद्यापीठ स्‍थापन करण्‍यात आलं, जे आज डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्‍त विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं. दूरशिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन झालं ते १९८५ मध्‍ये. या वर्षी दिल्‍ली येथे इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठ स्‍थापन झालं. हे विद्यापीठ दूरशिक्षण देणा-या भारतातील सर्वोच्‍च दहा मुक्‍त विद्यापीठांमध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर आहे. येथे कमी खर्चाचे आणि जवळपास सर्व विषयांचे अभ्‍यासक्रम आहेत. बहुमाध्‍यमं, माहिती आणि संवाद : विद्यापीठ पातळीवरील अभ्‍यासक्रमाची दारं ज्‍यांना उघडी नव्‍हती किंवा ज्‍यांना तिथपर्यंत जाता येत नव्‍हतं अशांना मुक्‍त विद्यापीठानं खुलं निमंत्रण दिलं. दूरशिक्षणाला १९९० पासून मोठ्या प्रमाणावर कलाटणी मिळाली आणि या शिक्षणाचा अधिक विस्‍तार झाला. तो बहुमाध्‍यम आणि माहिती, संवाद आणि तंत्रज्ञानाचा विस्‍तार यांच्‍यामुळे. सामाजिकदृष्‍टया कमकुवत घटकांसाठी तर हे शिक्षण एक पर्वणीच ठरलं आहे. या शिक्षणाचा विस्‍तार बघितला तर असं दिसतं की, भारतात एक राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठ, १४ राज्‍य स्‍तरावरील विद्यापीठं आणि १००हून अधिक संस्‍था दूरशिक्षणाला वाहिलेल्‍या आहेत. इग्‍नू, दिल्‍ली, अन्‍नामलई, उस्‍मानिया, सिक्कीम, मणिपाल, नालंदा, सिम्बॉएसि‍स, मद्रास विद्यापीठ, महात्‍मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम, कर्नाटक राज्‍य मुक्‍त विद्यापीठ आणि आयसीएफएआय विद्यापीठ, त्रिपुरा ही दूरशिक्षण देणारी नामांकित विद्यापीठं आहेत.