दूधगंगा धरण
राजर्षि शाहुसागर असे नामकरण झाले आहे
दूधगंगा धरण | |
अधिकृत नाव | दूधगंगा |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
दूधगंगा |
स्थान | गाव: आसनगांव, तालुका: राधानगरी, जिल्हा: कोल्हापूर |
सरासरी वार्षिक पाऊस | ४९३० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९७७ - काम चालू |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ११२१ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ८५.३० मी (सर्वोच्च)
लांबी : १२८० मी
दुधगंगा-वेद्गंगा धरण
तलावांचा तालुका अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील तलावांत पाणीसाठा समाधानकारक आहे.गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी तीन टी.एम.सी.पाणीसाठा अधिक असूनपाणी स्थिती समाधानकारक आहे.तालुक्यात राधानगरी,तुळशी आणि काळम्मावाडी असे तीन जलाशय आहेत.तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी पंचवीसशे मिलीमीटर आहे, त्याशिवाय धरण क्षेत्रात अधिक प्रमाणात पाऊस असल्याने तिन्ही जलाशय पूर्ण क्षमतेने भरतात.या तीन तलावात ३७ टीएमसी पाणीसाठा होतो. राधानगरी जलाशयात सध्या ४.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. तर मागील वर्षी २.६७ टीएमसी पाणीसाठा होता.राधानगरी जलाशयाचे पाणी भोगावती नदीपात्रातून कोल्हापूर,इचलकरंजी,शिरोळपर्यंत वाहते. शेती सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. कोल्हापूरसह सीमाभागातील शेतीला वरदान ठरलेले काळम्मावाडी येथील राजर्षी शाहू सागर जलाशय या धरणात यावर्षी पंचवीस टीएमसी पाणीसाठा झाला होता.या तलावातील पाणी दूधगंगा नदी, डावा कालवा आणि उजवा कालवा यामधून सिंचनासाठी विसर्गित केले जाते शिवाय गैबी बोगद्यामधून भोगावती नदीपात्रात सोडले जाते. पाण्याचे योग्य नियोजन आणि पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सध्या तलावात १२.२५ टीएमसी.पाणीसाठा आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील साडेतीन टीएमसी जलसाठा क्षमतेच्या तुळशी जलशायत सध्या २.०३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १.९६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. या तलावाच्या पाठीमागील बाजूस लोंढा केळोशी पाऊण टीएमसी जलसाठा असलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तालुक्यातील या तीन तलावांशिवाय केळोशी,हसणे,दाजीपूर ,कौलव येथील लघु तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीस्थिती चांगली आहे. 'राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मागील वर्षीपेक्षा सुमारे तीन टीएमसी पाणी अधिक शिल्लक आहे. पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जाणार आहे.
'काळमावाडी ,राधानगरी जलाशयात पाणीसाठा चांगला आहे. सिंचन क्षेत्रातील नागरिकांनी पाणी नियोजन चांगले केले आहे. भोगावती नदीमध्ये काळम्मावाडी धरणातून अजून तीन टीएमसी विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल.
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : ७०.८० मी.
सर्वोच्च विसर्ग : १९४० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी)
पाणीसाठा
संपादनक्षमता : ७१९.१२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६७९.६६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४६५८ हेक्टर
ओलिताखालील गावे : १२
कालवा
संपादनडावा कालवा
संपादनलांबी : २०० कि.मी.
क्षमता : ७३.६३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र :
- महाराष्ट्र : ७३३४० हेक्टर
- कर्नाटक : १९८६९ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ८१०९२ हेक्टर
उजवा कालवा
संपादनलांबी : २०० कि.मी.
क्षमता : २३.०८ घनमीटर / सेकंद
वीज उत्पादन
संपादनजलप्रपाताची उंची : ४२ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ३५.७० क्यूमेक्स / संयंत्र
निर्मीती क्षमता : २४ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X १२ मेगा वॅट