दुसरा राज वोडेयार (२६ मे, १६१२ - ८ ऑक्टोबर, १६३८) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा अकरावा राजा होता. हा १६३७-३८ अशी जेमतेम दोन वर्षे सत्तेवर होता. हा पहिल्या राज वोडेयारचा चौथा मुलगा होता.

राजवट

संपादन

दुसरा राज वोडेयार १६३७ मध्ये सहाव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर वयाच्या २५व्या वर्षी सिंहासनावर बसला. राज्याभिषेकाच्या एक वर्षभरात त्याच्याच सेनापतीनी त्याच्यावर विषप्रयोग करवून मारला.

त्याच्यानंतर त्याचा चुलत भाऊ पहिला कांतिरव नरसराज सिंहासनावर आला.